शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

शापोरा, बेतूल प्रकल्प लादलेले नाहीत!

By admin | Updated: June 15, 2016 01:43 IST

पणजी : शापोरा येथील नदीचा पर्यटनासाठी वापर करणे आणि दक्षिण गोव्यातील बेतूल येथे सॅटेलाईट बंदर उभारणे हे प्रकल्प

पणजी : शापोरा येथील नदीचा पर्यटनासाठी वापर करणे आणि दक्षिण गोव्यातील बेतूल येथे सॅटेलाईट बंदर उभारणे हे प्रकल्प सरकारने लोकांवर लादलेले नाहीत. केवळ चर्चेसाठी लोकांसमोर खुले केले आहेत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, शापोरा येथील नदीचा वापर पर्यटनासाठी व्हावा व त्यातून रोजगार संधी आणि नोकऱ्या तयार व्हाव्यात, ही कल्पना माझी आहे. तथापि, मी ती लोकांवर लादलेली नाही. अगोदर पंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य यांना बोलावून आपण त्यांच्यासमोर शापोरा प्रकल्पाचा विषय मांडला. प्रत्येकास तो आवडला. त्यानंतर सर्व संबंधित पंचायत क्षेत्रातील लोकांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण व्हावे असे ठरले. तथापि, काहीजण या प्रकल्पाच्या मार्गात मुद्दाम अडथळे निर्माण करू पाहत आहेत व त्यासाठी आमच्या पंचायत क्षेत्रात प्रकल्पाचे सादरीकरण देखील नको, अशी हुकूमशाही पद्धतीची भूमिका मोजके लोक घेत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने त्या परिसरात आणखी पर्यटनस्थळे तयार व्हावीत, असा माझा प्रयत्न आहे. पेडणे तालुक्यात आणखी दोन-तीन पंचतारांकित हॉटेल्स उभी राहावीत, असेही मला वाटते. शापोरा प्रकल्प काय आहे ते राजकारण्यांनी व लोकांनी निदान एकदा पाहून तरी घ्यावे व मग निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री म्हणाले की, बेतूल येथील बंदराच्या विषयाबाबत मी संवेदनशील आहे. केंद्र सरकारला मी त्यासाठी मान्यता दिलेली नाही. लोकांनी त्याविषयी अगोदर चर्चा करूद्या. (खास प्रतिनिधी)