शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 14:40 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. निदान राजपत्रित अधिकारी, आयएएस, आयपीएस, आयएफएस या स्तरावरील अधिकाऱ्यांनी तरी रविवारी सक्रिय असायलाच हवे, अशा प्रकारची भुमिका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली आहे.प्रमोद सावंत यांनी रविवारी (30 जून) आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना अनेक सूचना केल्या.

पणजी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. निदान राजपत्रित अधिकारी, आयएएस, आयपीएस, आयएफएस या स्तरावरील अधिकाऱ्यांनी तरी रविवारी सक्रिय असायलाच हवे, अशा प्रकारची भुमिका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली आहे.

रविवारी सरकारी कार्यालये खुली नसतात पण रविवारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सक्रिय तरी राहायला हवे. याच हेतूने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी (30 जून) आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना अनेक सूचना केल्या. मुख्यमंत्री स्वत: रोज सोळा तास काम करतात. मुख्यमंत्री आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या सरकारी बंगल्यावर रात्री राहत नाहीत. ते आपल्या साखळी मतदारसंघातील घरी रात्री जातात आणि पुन्हा सकाळी पणजीत दाखल होतात. तत्पूर्वी साखळीत ते मोठय़ा संख्येने लोकांना भेटतात. 

पणजीत मुख्यमंत्र्यांनी जनता दरबारही घेतला होता. पणजी किंवा साखळीत होणाऱ्या बैठकांवेळी लोकांकडून सावंत यांना सरकारी खाती व सरकारी कार्यालयांच्या संथ गतीच्या कारभाराविषयी तक्रारी ऐकायला मिळतात. यामुळे मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना अधिक सक्रिय करण्यावर भर दिला आहे. आयएएस, आयपीएस आदी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर जावे, केवळ सचिवालयात बसून न राहता तालुकास्तरावरील कार्यालये आयएएस अधिकाऱ्यांनी सक्रिय करावीत अशी सूचना बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रविवारीही सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी बंगल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व ठरलेल्या वेळेत लोकांना सेवा मिळायला हवी यावर भर दिला. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी काही खाते प्रमुखांच्या बदल्या केल्या. आणखीही बदल्या होणार आहेत. प्रशासनाची घडी नीट बसविण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. यापुढे खाते प्रमुखांचीही रविवारी बैठक घेईन, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शनिवार व रविवारीही सगळे मंत्री सक्रिय असतात, मग आयएएस व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्रिय राहायला नको काय असा प्रश्न काही मंत्री विचारत आहेत.

मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू

कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे. यामुळे गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे.गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी दहा वाजले तरी हजर होत नाहीत अशा तक्रारी सरकारकडे येतात. काहीजण दहा वाजता आले तर अकरा वाजता बाहेर कुठे तरी निघून जातात. परिणामी कामावर विपरित परिणाम होतो. लोकांना साध्या कामांसाठीही सरकारी कार्यालयात खूप फेऱ्या माराव्या लागत आहेत. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गट विकास अधिकारी, तलाठय़ांची कार्यालये, ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वाहतूक, नगर नियोजन आदी अनेक खात्यांची राज्यभर कार्यालये आहेत. तिथे रोज शेकडो गोमंतकीय आपल्या कामांसाठी येतात. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत