शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा मंच-मगोपचे ३० उमेदवार निश्चित

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

पणजी : गोवा सुरक्षा मंच, मगोप आणि शिवसेना यांचे मिळून एकूण ३0 उमेदवार निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे पणजीत

पणजी : गोवा सुरक्षा मंच, मगोप आणि शिवसेना यांचे मिळून एकूण ३0 उमेदवार निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे पणजीत राजू सुकेरकर, ताळगावमध्ये माजी महापौर अशोक नाईक आणि सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी मतदारसंघात विनय तारी यांना गोवा सुरक्षा मंचने आपले उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. अधिकृत घोषणा करण्याचा सोपस्कार उद्या सोमवारी पार पडेल. राजू सुकेरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ते पूर्वी तिसवाडी तालुका संघचालकही होते. गेले अनेक दिवस सुकेरकर यांच्या नावाची चर्चा गोवा सुरक्षा मंचमधून ऐकू येत होती. शनिवारी येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या बैठकीवेळी सुकेरकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. स्वत: सुकेरकर यांनीही रिंगणात उतरणे त्या बैठकीवेळी मान्य केले. सुकेरकर यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन काम सुरू केल्याचे भाषा सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मगोप विधानसभेच्या एकूण २२ जागा लढवणार आहे. त्यापैकी १९ उमेदवार निश्चित केले आहेत. गोवा सुरक्षा मंच एकूण ९ जागा लढवणार आहे. त्यापैकी सहा ते सात मतदारसंघ हा पक्ष स्वत:च्या चिन्हावर लढवील. फळा (ब्लॅक बोर्ड) हे चिन्ह गोवा सुरक्षा मंचला मिळाले आहे. (खास प्रतिनिधी)