शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्त मतदानाला तिलांजली

By admin | Updated: February 12, 2017 02:30 IST

गोव्यात गुप्त मतदान पद्धत आणि लोकशाहीची थट्टा सुरू असून निवडणुकीच्या कामावर असलेले सरकारी कर्मचारी उमेदवार तसेच आमदार-मंत्र्यांना मतपत्रिका दाखवून त्यांच्यासमोरच

- सद्गुरु पाटील,  पणजी

गोव्यात गुप्त मतदान पद्धत आणि लोकशाहीची थट्टा सुरू असून निवडणुकीच्या कामावर असलेले सरकारी कर्मचारी उमेदवार तसेच आमदार-मंत्र्यांना मतपत्रिका दाखवून त्यांच्यासमोरच मतपत्रिकेवर मतदान करत आहेत.निवडणूक कामावरील सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टाने मतपत्रिकेद्वारे मतदान करायला मिळते. मात्र, यंदा सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना मतदानासाठी एक महिन्याची मुदत मिळाली आहे. शिक्षक, अभियंते, कारकून, पोलीस, अव्वल कारकून असे हजारो कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांच्या हाती मतपत्रिका आहेत.बहुतांश कर्मचारी जो उमेदवार निवडून येईल असे वाटते किंवा जो आमदार किंवा मंत्री पुन्हा निवडून येईल असे वाटते, त्याला गाठून आपली राजकीय निष्ठा दाखवू लागले आहेत. उमेदवारांना मतपत्रिका दाखवून ‘पाहा, मी तुमच्यासमोरच मतदान करत आहे,’ असे कर्मचारी सांगत आहेत. काही कर्मचाऱ्यांना आमदार व संबंधित उमेदवारांची शाबासकी मिळत आहे, तर काही कर्मचाऱ्यांना उमेदवारांकडून पैसेही मिळू लागले आहेत, अशी माहिती आहे.काही उमेदवार व आमदारांनी मतदारसंघातील कोणते व किती सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामावर होते, त्याची यादी तयार करून त्या कर्मचाऱ्यास गाठण्याचे प्रकार सुरू केले आहेत. मोजक्याच कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे मतदान करण्याचा मार्ग पत्करला आहे. बहुतांश कर्मचारी मतपत्रिका उमेदवारांकडे व आमदारांकडे नेऊन त्यांच्याच हस्ते मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर व चिन्हासमोर फुली मारून घेऊ लागले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच हा प्रकार घडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या प्रकारांच्या तक्रारी पोहोचल्या आहेत. काही मतदारसंघांतील निकालांवर या गैरप्रकारांचा परिणाम होणार आहे.