शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोविड पॉझिटिव्ह मतदारांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:15 IST

कोविडग्रस्त मतदारांना सायंकाळी चार ते पाच या वेळेत मतदान केंद्रावर येऊन मतदान करायला परवानगी आहे.

पणजी : राज्यातील कोणत्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात किती व कोण कोविडग्रस्त मतदार आहे याचा शोध मतदानाच्या दिवशी गटस्तरीय अधिकारी (बीएलओ) घेणार आहेत. मतदान केंद्रावर मतदान करायला येताना कोविडग्रस्त मतदारांनी अंगावर पीपीई किट व हातात मोजे घालणे गरजेचे आहे. येत्या १२ रोजी जिल्हा पंचायतींसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी कोविडच्या नजरेतून राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जारी केली आहेत.

कोविडग्रस्त मतदारांना सायंकाळी चार ते पाच या वेळेत मतदान केंद्रावर येऊन मतदान करायला परवानगी आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराला थर्मल गनने तपासले जाईल. त्याला ताप आलेला आहे काय याची तपासणी होईल. जर एखादा मतदार कोविड पॉझिटीव नाही पण तो मतदान केंद्रावर आला असता, त्याला थोडा ताप असल्याचे आढळून आले तर बाजूच्या शेडमध्ये त्याला दहा मिनिटांसाठी बसवून ठेवले जाईल. पुन्हा त्याची तपासणी केली जाईल. पुन्हा देखील त्याला ताप असल्याचे स्पष्ट झाले तर मग अशा मतदाराला सायंकाळी चार ते पाच याच वेळेत मतदान करण्यासाठी या असे सांगितले जाईल.

मतदान केंद्रावरील जागा सेनिटाईज केल्या जातील. तेथील साहित्य सेनिटाईज केले जाईल. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ््यांना हातमोजे दिले जातील. कोविडग्रस्त मतदाराने कर्मचाऱ््यांना त्याच्या ओळखीचा पुरावा दाखवावा. मतदान केंद्राच्या ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे मनाई असेल. निवडणूक प्रक्रियेशीसंबंधित वाहन चालकांनी सर्व एसओपींचे पालन करावे, आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक ती काळजीघ्यावी, असे आयोगाने म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी एखादा अधिकारी किंवा कर्मचारी केंद्रावरच कोविडची काही लक्षणे दाखवू लागला तर त्याला आयसोलेट केले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.मतमोजणीच्यावेळी सभागृहातील कर्मचाऱ््यांनी फेसमास्क घालावे. बाहेर लोकांची मोठी गर्दी होऊ देऊ नये, असे आयोगाला अपेक्षित आहे.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या