शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून ‘संगीत खुर्ची’वर पडदा

By admin | Updated: March 3, 2016 03:03 IST

पेडणे : राज्याला १० वर्षांत ११ मुख्यमंत्री देऊन विरोधकांनी सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ चालविला होता.

पेडणे : राज्याला १० वर्षांत ११ मुख्यमंत्री देऊन विरोधकांनी सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ चालविला होता. हा खेळ भाजपाने बंद पाडून विरोधकांना अद्दल घडवतानाच राज्याचा चौफेर विकास केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले. पेडणे टॅक्सी स्टॅँड येथे बुधवारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभा आयोजिली होती. सभेस लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, स्थिर व स्वच्छ प्रशासन आणि चाळीसही मतदारसंघांचा चौफेर विकास हा भाजपाच करू शकतो. सभेला उपसभापती विष्णू वाघ, पंचायतमंत्री राजेद्र आर्लेकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, थिवीचे आमदार किरण कांदोळकर, भाजपा सरचिटणीस सदानंद तानावडे, जिल्हा सदस्य अरुण बांधकर, रमेश सावळ, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष कृष्णा गावडे, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश शेटमांद्रेकर, दीपक कळंगुटकर, मांद्रे सरपंच वैशाली शिरोडकर, विर्नोडा सरपंच सीताराम परब नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, उपनगराध्यक्ष उपेंद्र देशप्रभू, नगरसेवक गजानन सावळ देसाई, दीपक मांद्रेकर, प्रशांत गडेकर, सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका श्रद्धा माशेलकर, स्वाती कांबळी, तुये सरपंच प्राजक्ता कान्नाईक, नीलेश नाईक, शैलजा मळीक, धारगळ सरपंच सुनिता राऊळ, कासारवर्णे सरपंच मोहिनी नाईक, उगवे सरपंच विनायक महाले, नागेश गोसावी आदी हजर होते. पेडणे तालुक्याचा विचार केल्यास रस्ते, पूल, हॉस्पिटल, कॉलेज बस स्टॅँड पोलीस स्टेशन, शाळा या साधनसुविधांची कामे जोरात चालू आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी बोलताना जनतेचा पैसा जनतेकडे पोचवण्याची किमया केवळ भाजपा सरकारच करू शकतो. यापूर्वी तो पैसा कुठे जात होता? अशी विचारणा केली. मात्र, या विषयावर बोलताना माड हे जंगल झाड नव्हे तो लावावा लागतो. माड हे जंगल झाड नसताना ते फॉरेस्ट अ‍ॅक्टमध्ये का घातले असा सवाल करून ज्या जमिनी नागरिकांनी बेकायदा विकत घेतल्या त्या जमिनींचीही चौकशी होईल, असे आर्लेकर म्हणाले. उपसभापती विष्णू वाघ यांनी पुढील २५ वर्षांसाठी भाजपाशिवाय राज्याला पर्याय नाही. भाजपा हा लोकांचा पक्ष आहे. असे सांगून गोव्याचे नंदनवन भाजपाच करू शकतो असे सांगितले. ज्याला वडाची झाडे सांभाळता येत नाहीत ते माड कसे सांभाळतील, असा सावाल केला. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कॉँग्रेसचे नेते दिशाभूल करीत आहेत. यापूर्वीच्या सरकारने योजना का राबवल्या नाहीत, असा सवाल केला. थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी जनतेला दिलेली आश्वासने ९९ टक्के भाजपाने पूर्ण केली असून भविष्यातही राज्यात भाजपा सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा सदस्य रमेश सावळ यांनी आतापर्यंत भाजपाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. जिल्हा सदस्य अरुण बांधकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)