हणखणे : हणखणे येथील सरकारी शाळेला सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी भेट दिल्यानंतर तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधित अधिकारी पुढाकार घेतील अशी अपेक्षा असताना अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. हणखणे येथील नवीन इमारतीबाबत सर्व शिक्षा अभियानचे वरिष्ठ अधिकारी उपाध्ये यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हणखणे येथील सरकारी शाळेच्या दुरुस्तीबाबत अद्याप कोणीही अधिकारी तेथे पोहोचला नाही. यावरून शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना शाळेतील मुले आणि सरकारी शाळा याबाबत किती आस्था आहे याची कल्पना येते. सभापती आर्लेकर यांनी आकस्मिक येऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संबंधित अधिकारी मुलांच्या भवितव्याबद्दल गांभिर्याने विचार करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पालकांचा अपेक्षाभंग झाला. (प्रतिनिधी)
हणखणे शाळेची स्थिती जैसे थे...
By admin | Updated: July 5, 2014 00:47 IST