शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औद्याेगिक वसाहतींच्या जागाही बिल्डरांना विकण्याचा डाव; गोवा फॉरवर्डचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2023 14:50 IST

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने नवनवीन उद्योग आणून नाेकऱ्या तयार करणे आहे. पण गाेव्यात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली औद्यागिक जमिनी बिल्डरांना विकल्या जात आहे.

नारायण गावस

पणजी: गोव्यातील औद्योगिक वसाहतींच्या जागाही आता बिल्डरांना विकण्याचा डाव सरकारचा आहे. जुआरी औद्योगिक वसाहतीची जागा बिल्डरांना देण्याचा डाव असून त्याला गोवा फॉरवर्डचा तिव्र विरोध असणार आहे. ही जागा बिल्डरांना न विकता या ठिकाणी अन्य सरकारचा प्रकल्प घालावा, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने नवनवीन उद्योग आणून नाेकऱ्या तयार करणे आहे. पण गाेव्यात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली औद्यागिक जमिनी बिल्डरांना विकल्या जात आहे. या ठिकाणी माेठी बांधकामे होत आहे. याला मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री जबाबदार आहे. आम्ही गाेव्यातील जमिनी बिल्डरांना विकायला देणार नाही. सध्या पेडण्यापासून काणकोणपर्यत सर्वच ठिकाणी माेठ्या प्रमाणात जागा विकल्या जात आहे. ४० लाख चौरस मिटर जागा मोपा पिडीएसाठी बदलली आहे. या जागेत आता माेठ्या प्रमाणात बांधकाम हाेणार आहे. प्रत्येक ठिकाणी शेतजमिनीच्या जागा बांधकामासाठी बदलल्या जात आहे. सरकारने अजूनही रिजनल प्लॅन २०२१ लागू केलेला नाही. सरकारचा गाेव्याच्या जमिनी विकायचा हेतू आहे. म्हणून मंत्री आमदार सर्वच गप्प आहे, असे यावेळी विजय सरदेसाई यांनी सांगितले.बेरोजगारीत गोवा दुसरालेबर फोर्स सव्र्हे नुसार गाेव्याचा बेराेजगारी दर हा देशात दुसरा आहे. गोव्यात ९.७ टक्के बेरोजगारी दर वाढला आहे. हा बेरोजगारी दर कमी करण्यासाठी कुठलाच निर्णय घेतला जात नाही. पण गाेव्याच्या शेत जमिनी मात्र बिल्डरांना विकण्यासाठी प्रयत्न सुरु केले जात आहे .यासाठी मुख्यमंत्रया्पासून सर्व मंत्री राष्ट्रीय नेत्यांना भेटत आहे. हे मंत्री लाेकांच्या भल्यासाठी नाही तर गाेव्याच्या जमिनी कशा बाहेरील बिल्डरांना विकता येणार यासाठी चर्चा करायला जात आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.