शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

समीरचे होते मलगोंडा पाटीलशी संबंध

By admin | Updated: September 17, 2015 03:22 IST

मडगाव : कॉ. गोंविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड याचा मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचा

मडगाव : कॉ. गोंविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड याचा मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप झालेला सनातनचा साधक मलगोंडा पाटील याच्याशी संबंध होता, हे तपासात स्पष्ट झाले आहे. मलगोंडा पाटील याच्याशी समीरचे मित्रत्वाचे संबंध होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मलगोंडा हा मडगावातील स्फोटाचा मास्टर माइंड होता, असा एनआयएचा दावा होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, समीरचा गेल्या आठ वर्षांपासून सनातन संस्थेशी संबंध होता. त्याची पत्नीही सनातनची साधक असून गोव्याच्या आश्रमात ती राहात असे. मलगोंडा पाटील याचा आॅक्टोबर २00९ मध्ये मडगावात दिवाळीच्या पूर्वसंध्येस झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कारस्थानात हात होता, असा या प्रकरणात तपास करणाऱ्या एनआयएचा दावा होता. त्या स्फोटात मलगोंडासह अन्य एक सनातनशी संबंध असलेली व्यक्ती ठार झाली होती. या प्रकरणात नंतर एनआयएने सनातनशी संबंध असलेल्या नऊ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, तांत्रिक कारणासाठी तसेच पुराव्याअभावी ते सर्व निर्दोष मुक्त झाले होते. या ताज्या घडामोडीनंतर फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी फोंडा पोलीस यासंबंधी कसलाही तपास करीत नसून महाराष्ट्राच्या पोलिसांनीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)