शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

समीर सारदानाची सशर्त जामिनावर सुटका

By admin | Updated: February 12, 2016 03:56 IST

वास्को : गोव्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करून ताब्यात घेतलेल्या समीर सारदाना (४६ वर्षे)

वास्को : गोव्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करून ताब्यात घेतलेल्या समीर सारदाना (४६ वर्षे) याला वास्को येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने ठोस पुरावे सादर न केल्याने त्याची सशर्त जामिनावर सुटका केली़ तसेच समीरला चार दिवस गोव्याबाहेर न जाण्याचे, चार दिवसांत एटीएसमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायाधीश शबनम शेख यांनी दिले़ वास्को रेल्वे पोलिसांनी आतंकवादी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या देहरादून येथील समीर सारदाना याला नंतर एटीएसच्या स्वाधीन केले होते. मात्र, एटीएस त्याच्याविरुध्द गेल्या आठ दिवसांत ठोस अशी काहीच माहिती गोळा करू न शकल्याने तसेच त्याच्याजवळ असलेल्या लॅपटॉपमधील माहिती प्राप्त करू न शकल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला. माहिती गोळा करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याने एटीएसने न्यायालयीन कोठडी मागितली होती़ या वेळी अ‍ॅड. शशिकांत एऩ जोशी यांनी हरकत घेतली़ जोशी यांनी युक्तिवाद करताना, समीर सारदाना याला सबळ पुराव्याविना नाहक एटीएसने अडकवून ठेवले असल्याचा दावा केला. सरकारी वकील अ‍ॅड़ देवानंद कोरगावकर यांनी एटीएसची बाजू मांडली़ दरम्यान, दोन्ही बाजंूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तसेच सरकारपक्षातर्फे समीर सारदानाच्या बाबतीत ठोस पुरावे सादर करण्यास एटीएस अपयशी ठरल्याने अखेर न्यायाधीश शबनम शेख यांनी आपला निवाडा देताना समीरला सशर्त जामीन मंजूर केला़ या वेळी समीरचे मामा-मामी न्यायालयात उपस्थित होते़ समीरचे मामा निवृत्त कमांडर हरविंदर सिंग रावत यांनी आपल्या भाच्यासाठी जामीन दिला़ माझा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे समिर याने सांगितले़ तसेच न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्वास होता व मी मुक्त होणार हे मला माहीत होते, असे तो म्हणाला. पत्रकारांना तंबी आज न्यायालयात समीर सारदाना याची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीश शबनम शेख यांनासमोर असलेल्या बाकावर एक पत्रकार न्यायालयात होत असलेली वकिलांची बोलणी रेकॉर्ड करत असताना त्यांच्या नजरेस पडले़ त्यांनी त्वरित पोलिसांना त्या पत्रकारासहित इतर समोर बसलेल्या एक मराठी (लोकमत नव्हे) व इंग्रजी दैनिकांच्या पत्रकारांचे मोबाईल जप्त केले़ सुनावणी संपल्यानंतर तंबी देऊन त्या पत्रकारांना मोबाईल देण्यात आले़ (वार्ताहर)