शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाषा मंचच्या जखमेवर मीठ

By admin | Updated: January 4, 2016 01:30 IST

पणजी : इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयांचे अनुदान बंद न केल्यास येत्या निवडणुकीत भाजप

पणजी : इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयांचे अनुदान बंद न केल्यास येत्या निवडणुकीत भाजप सरकारला हाकलून लावू, असा इशारा देणाऱ्या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या जखमेवर सरकारने मीठ चोळले आहे. मंचच्या इशाऱ्यामुळे सरकार कदाचित नमेल, अशी अपेक्षा कोणी केली असेल तर ती फोल ठरली आहे. मंचची मागणी मंजूर करण्याचे राहिले दूरच; परंतु सर्वच इंग्रजी विद्यालयांना अनुदान देण्याची तरतूद करणारे नवे विधेयक येत्या अधिवेशनात आणण्याची घोषणा करून सरकारने मंचला मोठाच दणका दिला आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच म्हणजे मराठी, कोकणीतून दिले जावे, अशी मंचची भूमिका आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या प्राथमिक विद्यालयांना दिले जाणारे अनुदान रद्दच करावे, अशी मागणी मंचकडून नेटाने पुढे रेटली जात आहे. त्यासाठी दबावतंत्राचा वापरही केला जात आहे. प्रत्येक आमदाराला भेटून त्यांच्याकडून माध्यमप्रश्नी स्थानिक भाषांना पाठिंबा देण्याचे आश्वासन घेतले जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सरकारशी संघर्षाची भूमिका घेतली आहे. असे असतानाही या विरोधाची साधी दखलही न घेता उलट माध्यमप्रश्नी इंग्रजी माध्यमिक विद्यालयांना अनुदानाची तरतूद करणारे विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर करण्याचा इरादाही सरकारने जाहीर केला आहे. या प्रकारामुळे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. दरम्यान, मंचच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते आणि काही आमदारांनी समर्थन दिले असले तरी पक्ष म्हणून त्यांचा भाजप सरकारच्या निर्णयाला पाठिंबा राहणार आहे. या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाकडून सरकारला दिला आहे आणि सरकार जो निर्णय घेईल त्याला पक्षाचा पाठिंबा राहणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष विल्फ्रेड मिस्किता यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)