शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

मराठी राजभाषेसाठी तालुकावार धरणे

By admin | Updated: December 3, 2015 01:45 IST

पणजी : मराठी राजभाषेसाठी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील राजभाषा समितीने लढा तीव्र करण्याचे ठरविले आहे.

पणजी : मराठी राजभाषेसाठी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील राजभाषा समितीने लढा तीव्र करण्याचे ठरविले आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन राजभाषा समितीने जाहीर केले असून येत्या १0 डिसेंबर रोजी यास सुरुवात होईल, असे ढवळीकर यांनी सांगितले. ८ जानेवारी रोजी पणजीत महामेळावा घेऊन मराठीप्रेमी शक्तिप्रदर्शन करतील, असेही त्यांनी जाहीर केले. ढवळीकर, अशोक नाईक आदींनी मिळून बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मराठीला राजभाषा करण्याचे आश्वासन दिले होते. पार्सेकर सरकारने हे आश्वासन पाळण्याची हीच योग्य वेळ आहे. मुख्यमंत्री पार्सेकर हे मराठीला राजभाषा करण्याबाबत सकारात्मक आहेत; पण मराठी राजभाषेचे विधेयक आणण्याबाबत त्यांचे सरकार चालढकल करत आहे, असे ढवळीकर म्हणाले. तीन वर्षे थांबा, त्यानंतर आपण मराठीचा विषय हाती घेऊ, असे मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात आता मुख्यमंत्री पार्सेकर हे २०१७ सालानंतर मराठी राजभाषेचा विषय हाती घेऊ, असे सांगतात. आम्हाला आंदोलन करण्याची इच्छा नव्हती; पण सरकार मराठीवर अन्याय करत असल्यामुळे आम्ही आंदोलन जाहीर करत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. राजभाषा कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक येत्या अधिवेशनात सरकारने मांडून मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठीला राजभाषा कायद्याद्वारे यापूर्वी जे काही दिले गेले आहे, तेदेखील सरकार देत नाही. केवळ इंग्रजी व कोकणीचाच वापर करून मराठीला डावलले जाते. कोकणीस आमचा विरोध नाही. कोकणी व मराठी या दोन्ही गोव्याच्या भाषा आहेत. मराठीचा वापर गोव्यात जास्त होत आहे आणि राज्यभर मराठीप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. आम्ही कोकणीसोबत मराठीलाही राजभाषा करा, अशी मागणी करत आहोत, असे ढवळीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)