शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित या, सुरक्षित रहा, सुरक्षित चला, पोलिसांचा पर्यटकांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 19:13 IST

सरळमार्गे या किंवा आड मार्गे या येताना कायद्याचे उल्लंघन करून येण्यापेक्षा त्याचे पालन करून या.

म्हापसा : सरळमार्गे या किंवा आड मार्गे या येताना कायद्याचे उल्लंघन करून येण्यापेक्षा त्याचे पालन करून या. सहकार्य करून गोव्यात वास्तव्य करा. गोवा तुमचा आहे. त्यामुळे सुरक्षेवर भर देण्यास सहकार्य करून निवांत वास्तव्य करा व आनंदाने माघारी चला असा जणू संदेश गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी दिला आहे. पुढील किमान आठ दिवस तरी कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी जागोजागी नाक्यावर आड वाटेवर राहून सुरक्षेवर भर दिलेल्या पोलिसांनी त्यातून संदेश देत आहेत.नाताळापासून ते नवीन वर्षापर्यंत गोव्यात पर्यटकांची रिघ लागलेली असते. या दिवसात येणारा पर्यटक किना-यावर जाण्यास प्राधान्य देत असतो. खास करून उत्तर गोव्यातील कांदोळीपासून ते बागापर्यंत तसेच मोरजीपासून ते हरमलपर्यंतच्या किना-यावर जाण्यास तो भर देत असतो. फिरणे सोयीस्कर ठरावे यासाठी स्वत:ची वाहने घेऊन हे पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे या काळात गोव्यातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण तणाव पडलेला असतो. वाढलेल्या या तणावाच्या काळात पर्यटकांसोबत स्थानिकांना कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. किनारी भागात तर त्यांचा जास्त प्रमाणावर वापर केला जात आहे.गोव्यात दाखल होत असलेले तसेच नव्याने आलेले पर्यटक रस्ता माहीत नसल्याने सरळ मार्गी किंवा प्रमुख रस्त्याचा वापर करीत असतात; पण अनेक वेळा येऊन गेलेले पर्यटक वाहनांच्या होणा-या गर्दीतून वाट काढणे सोयीस्कर ठरावे किंवा कायद्यापासून पोलिसांच्या जाचापासून सुटका करून घेण्यासाठी आड मार्गाचा कमीत कमी वाहतूक असलेल्या मार्गाचा वापर करतात. आड मार्गाने जाताना गैरप्रकार करण्यावर भर देत असतात. हे प्रकार थांबावे नियंत्रणात राहावे यासाठी पोलिसांकडून सरळ मार्गाबरोबर आड मार्गावरही देखरेख ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. तपासणी करताना त्यातून येणा-या पर्यटकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा रस्त्यावरील इतर वाहन चालकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता बाळगली जात आहे.कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी या संबंधी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीत सुसूत्रता रहावी दुस-यांना अडथळे निर्माण होऊ नये तसेच इतरांना त्रास होऊ नये यासाठी ही उपाय योजना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातून कोणालाही कसल्याच प्रकारचा त्रास केला जात नसल्याचे ते म्हणाले. पोलीस हे लोकांच्या सहकार्यासाठी त्यांच्या मदतीसाठी असल्याने प्रत्येकाने या दिवसात त्यांना मदत करावी, असे मत म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी व्यक्त केले.