शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासाशी प्रतारणा चालत नाही! अभिनेते सचिन खेडेकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 22:36 IST

ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करताना इतिहासाशी प्रतारणा करून चालत नाही. असे ऐतिहासिक चित्रपट करताना सत्यता आणि जबाबदारपणा सांभाळला पाहिजे.

- विलास ओहाळ

पणजी- ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करताना इतिहासाशी प्रतारणा करून चालत नाही. असे ऐतिहासिक चित्रपट करताना सत्यता आणि जबाबदारपणा सांभाळला पाहिजे. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा चित्रपट करताना श्याम बेनेगल यांनी तो जबाबदारपणा पाळल्याचे आपणास दिसते, असे सांगत अभिनेते सचिन खेडेकर यांनी ऐतिहासिक चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकांना कानपिचक्या दिल्या.

बायोस्कोप व्हिलेजच्या कट्ट्यावर शनिवारी रात्री मीना कर्णिक यांनी अभिनेते सचिन खेडेकर यांची मुलाखत घेतली. कच्चा लिंबू आणि मुरांबा हे चित्रपट इफ्फीत असून, त्यातील दोन्ही चित्रपट इफ्फीत स्पर्धेत आहेत. त्याविषयी खेडेकर म्हणाले की, प्रसाद ओक आणि वरूण नार्वेकर हे दोन्हीही तरुण आणि पहिलाच सिनेमा दिग्दर्शित करीत असल्याने त्यांच्याकडून मला बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण तरुण पिढीकडे बरेच विषय मांडण्यासारखे आहेत. नामवंत दिग्दर्शकांना त्याच-त्याच पठडीतील चित्रपट बनविण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावरून आता चित्रपट पाहण्याची मोठी सोय झाल्याचेही त्यांनी कौतुक केले. 

दाक्षिणात्य चित्रपटाचे आव्हान!खेडेकर एका प्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले की, मराठी, हिंदी चित्रपट करण्यापेक्षा दाक्षिणात्य चित्रपट करण्याचे फार मोठे आव्हान असते. येथे बाहेरील कलाकारांना फार सन्मान दिला जातो. तेलगु भाषेमध्ये एका शब्दात अनेक अर्थ दडलेले असल्याने त्यात राग, लोभ, प्रेम असे सर्व प्रकार एकाचवेळी दर्शविण्यासाठी शब्द उच्चरावे लागतात. येथील सिनेसृष्टीतील लोक फार मेहनती आहेत. शिवाय या भाषेतील चित्रपट पाहणारे रसिकही फार चित्रपटवेढे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटांना गर्दी दिसून येते. 

शॉ..काय नाटक!गोव्याविषयी बोलताना खेडेकर म्हणाले, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी आपण जेव्हा रंगभूमी करत होतो, तेव्हा गोवा दौरा व्हायचा. या राज्यातील महत्त्वाच्या शहरात नाटके केले जायची. जेव्हा नाटक पाहून लोक बाहेर यायचे तेव्हा लोक ‘शॉ..काय नाटक आहे!’ असे म्हणायचे. त्यामुळे हे लोक नक्की नाटकाचे कौतुक करतात की नापसंती दर्शवितात, हे कळत नव्हते. पण नंतर कळाले की, ती नाटकाचे केले जाणारे कौतुक आहे, तेव्हा रसिकांमध्ये हशा पिकला. 

गोवेकरांनी संस्कृती टिकवली!गोव्यात नाटक, सिनेमा पाहणारी रसिक मंडळी आहे. शिवाय त्यातील कलाकारही आहेत. येथे थिएटरला लागणारे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना येणारे रसिक पाहिल्यानंतर ख:या अर्थाने गोव्यातील जनतेने संस्कृती टिकवून ठेवली आहे, हे दिसते, असेही खेडेकर म्हणाले. 

रिअॅलिटी म्हणजे उसनी नक्कल!दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमाविषयी बोलताना खेडेकर म्हणाले की, विजय तेंडुलकर नेहमी ‘रिअॅलिटी शो’ विषयी सांगत. यातील गाण्यांच्या कार्यक्रमात जी मुले जुनी गाणी गातात, त्यांना परीक्षक गुण देतात. पण या मुलांना काय माहीतच नसते की उसनवारी आणि नक्कल आहे म्हणून. त्यामुळे रिअॅलिटी शोची कल्पनाच मुळीची चुकीचे वाटते. त्याचबरोबर आपण मराठीतील ‘कोण बनेल करोडपती’ या मालिकेने पुन्हा सामान्य माणसांर्पयत पोहोचण्याची संधी दिल्याची आठवण करून दिली.