शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थ तुरुंगात; सोनशीत शुकशुकाट

By admin | Updated: April 15, 2017 02:07 IST

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक

दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक रोखल्यामुळे गावातील ४५ जणांना कोलवाळ तुरुंगात डांबल्यामुळे गावातील सर्वच घरांना कुलपे लावलेली दिसून येतात. पालक तुरुंगात अडकल्याने मुलांचे हाल होत आहेत.लोकशाही व्यवस्था किती महागात पडते, याचे उदाहरण सोनशी गावात पाहावयास मिळते. सध्या गावात शांतता, तर रस्त्यावरून खनिज ट्रकांची उन्मत्त वर्दळ, अशी विरोधाभासाची स्थिती दिसते. गावातून सेसा गोवा, केणी, डीएमसी, फोमेन्तो, आयएलपीएलसारख्या बड्या खाण कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. खाण कंपन्या सुरू झाल्यापासून गावाला समस्या पोखरू लागल्या. धूळ प्रदूषण, पाणीटंचाईने डोके वर काढले. नागरिकांनी सरकार दरबारी तसेच खाण कंपन्यांकडे गाऱ्हाणी मांडली; पण न्याय मिळाला नाही. कंटाळलेल्या नागरिकांनी लोकशाही पद्धतीनेच रास्ता रोको केला. प्रथम प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आंदोलन बंद करण्यास सांगण्यात आले; पण बैठकीत तोडगा न निघाल्याने नागरिकांनी परत रस्ता रोको केला. त्या वेळी त्यांना अटक करून सोडून देण्यात आले; पण तोडगा काढण्यात आला नाही. उलट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक सुरू केली. त्या विरोधात नागरिकांनी पुन्हा रस्ता रोको केला आणि पोलिसांनी ४५ जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी दिली. या आंदोलकांची मुले सध्या हलाखीत जगत आहेत. सर्वच घरे बंद असून मुले आई-वडिलांच्या वाटेवर डोळे लावून आहेत.धुळीने माखला गावसोनशी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ११८४ ट्रक सुरू आहेत. त्यामुळे दर पाच सेकंदाला ट्रक येत असून पाच मिनिटांनी ट्रक सोडण्याचे खाण कंपन्यांनी दिलेले आश्वासन धाब्यावर बसविल्याचे दिसते. गावात धूळ प्रदूषण झाले आहे.पावसाळ्यात मातीवाहून येण्याची शक्यताखाण कंपनीने साठविलेली माती पावसाळ्यात गावात वाहून येण्याची शक्यता आहे. गावाजवळच मातीचे मोठमोठे ढिगारे असून पावसाळ्यात त्या ढिगाऱ्यांची माती गावात आल्यास गाव मातीखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेलाही धोका आहे.सरकारची खाण कंपन्यांना साथसरकारने प्रथमपासून खाण कंपन्यांची साथ दिली आहे. ग्रामस्थांनी आंदोेलन सुरू केल्यापासून नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडविले नसून पोलिसांनीसुद्धा खाण कंपन्यांचे समर्थन करताना नागरिकांना तुरुंगात डांबले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. सध्याची स्थिती सोडविण्यासाठी सरकारने नागरिकांना साथ देण्याची गरज होती; पण स्थिती विपरित आहे.अतिरिक्त वाहतूक बंदचा आदेशडिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शनिवारपासून अतिरिक्त खनिज वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. ११८४ ट्रकव्यतिरिक्त आणखी ट्रक वाहतुकीला न घेण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला. खाण कंपन्या आणखी ४00 अतिरिक्त ट्रक घेणार होत्या.(प्रतिनिधी)