शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कर्नाटकची धावाधाव

By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST

कर्नाटकची धावाधाव

डिचोली : ‘कर्नाटक निरावरी निगम’मार्फत कर्नाटकाने कळसा, हलतरा आणि भांडुरा या ठिकाणी धरणासाठी ज्या जागा निवडलेल्या आहेत. त्या राखीव जंगल क्षेत्रात येतात त्यामुळे या ठिकाणी धरण प्रकल्प उभारण्यासाठी ‘ना हरकत’ दाखल्यासाठी कर्नाटकने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला साकडे घातले आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सध्या विरप्पा मोईली यांच्याकडे असल्याने त्यांनी यासंदर्भात कळसा, हलतरा आणि भांडुरा या तिन्ही प्रकल्पांना कशीरितीने मंत्रालयाच्या वतीने ना हरकत दाखले देता येतील यासाठी युद्धपातळीवर चाचपणी सुरू केल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. कर्नाटकाने नियोजित धरण प्रकल्पासाठी ज्या तिन्ही जागा निवडलेल्या आहेत, त्या राखीव जंगल क्षेत्रात असून यापूर्वी माधव गाडगीळ समितीने व नंतर स्थापन झालेल्या उच्चस्तरीय कस्तुरीरंगन समितीने चोर्ला, कणकुंबी आणि नेरसे या ठिकाणी येणार्‍या या जागा पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रात समावेश केलेल्या आहेत. पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी विरप्पा मोईली आपल्या पदाचा गैरवापर करून कर्नाटकाचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने म्हादई पाणी वाटप लवादाची अधिसूचना काढून हे लवाद २ वर्षे कार्यान्वित होऊ नयेत, यासाठी त्यांनी हेतुपुरस्सर प्रयत्न केले आहेत. आता केंद्रीय वन मंत्रालयाची जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर धरणाच्या परवान्यांना मान्यता देण्यासाठी चाचपणी सुरू केल्याचे सांगितले. कळसा, हलतरा, भांडुरा असे तीन प्रकल्प या ठिकाणी उभे राहाणार आहेत. त्या ठिकाणचे जंगल समृद्ध असून सत्तरीत जंगल क्षेत्राचा समावेश आहे. कळसा धरणासाठी कणकुंबी १२३.३१ हेक्टर, पाटला १४ हेक्टर, हलतरा धरणासाठी ३५.१५ हेक्टर तर बरेच मोठे जंगल क्षेत्र नष्ट होणार आहे. भांडुरा प्रकल्पासाठी २४३.५१ हेक्टर जंगल नष्ट होणार आहे. कर्नाटकाने सध्या कळसा कालव्याच्या कामाला प्राधान्य दिले तरी त्यानंतर पूर्वनियोजित धरणाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कळसा नाला हा बारमाही वाहणारा म्हादईच्या अभयारण्याचा जलस्रोत असून, अभयारण्य क्षेत्राला धोका निर्माण होणार आहे. कर्नाटकाने धरणाची तयारी सुरू केली असून, नव्याने मार्किंग, रंगरंगोटी केलेली असून त्यामुळे एकूणच कर्नाटकाचा हा डाव गोव्यासाठी संकटाला आमंत्रण देणारा आहे. (प्रतिनिधी)