शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलेशी असभ्य वर्तन!

By admin | Updated: July 27, 2016 02:04 IST

कल्पेश काटकर ल्ल पणजी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी वन खात्याच्या एका उपवनपालाला दीर्घ रजेवर पाठविण्यात आले आहे.

कल्पेश काटकर ल्ल पणजी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी वन खात्याच्या एका उपवनपालाला दीर्घ रजेवर पाठविण्यात आले आहे. वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. हा अधिकारी दक्षिण गोव्यातील एका विभागीय क्षेत्रीय कार्यालयाचा प्रमुख असून त्याचे वागणे हे सभ्यतेला धरून नसल्याच्या तक्रारी होत्या. वरिष्ट वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याचे दिसून आल्यावर काहींनी थेट वनमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घातली. एका महिला कर्मचाऱ्याला त्याने खूपच सतावल्याची तक्रार होती. हा अधिकारी आपल्याकडे अत्यंत असभ्य वागत असल्यामुळे कार्यालयात काम करणे मुश्कील झाल्याचे त्या महिला कर्मचाऱ्याने मंत्र्यांना सांगितल्यावर तडकाफडकी त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या दीर्घ रजेवर पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेकडून तक्रार गेल्यानंतर कार्यालयातील इतर काही कर्मचाऱ्यांंकडून त्याची खातरजमा करून घेतल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. याविषयी प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना विचारले असता त्यांनी त्या विषयावर आपण काहीच बोलणार नाही, असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याला जोपर्यंत त्याची बदली इतरत्र होत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होण्यास मनाई करण्यात आली आहे. थेट मंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करून कारवाई करण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे. अधिकाऱ्यांच्या असभ्य वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेचे वातावरण बनू लागल्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. यापूर्वीही सरकारी कार्यालयांत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. या प्रकारांना वचक बसावा यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि मुख्य अधिकाऱ्याच्या केबिनसह सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमरे लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या.