शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘आउटलूक’वर ७५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

By admin | Updated: July 28, 2014 02:20 IST

माजी मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांची न्यायालयात धाव

पणजी : गोव्याचे पुत्र असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी येथील दिवाणी न्यायालयात आउटलूक या साप्ताहिकाविरुद्ध ७५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आउटलूकचे मुख्य संपादक कृष्णा प्रसाद यांच्यासह चौघांना समन्स बजावले आहे. पुढील सुनावणी ५ आॅगस्ट रोजी ठेवली आहे. या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातून आपली बदनामी झाल्याचे फेर्दिन यांचे म्हणणे आहे. गोव्यातील रिबेलो यांचे पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी अ‍ॅड. मारियो पिंटो आल्मेदा यांच्यामार्फत दाखल केलेल्या या खटल्यात पोर्तुगीज नागरी संहितेतील कलम २३६१, २३६२, २३६३ (२३८९ सह) या कलमांचा आधार त्यांनी घेतला आहे. आउटलूकचे माजी मुख्य संपादक विनोद मेहता, प्रकाशक महेश्वर पेरी, मेसर्स आउटलूक पब्लिशिंग इंडिया कंपनीलाही या खटल्यात प्रतिवादी केले आहे. ५ आॅगस्ट रोजी या सर्वांना स्वत: उपस्थित राहावे किंवा प्रतिनिधी पाठवावा व बचावासाठी म्हणणे सादर करावे, असे बजावले आहे. संबंधित लेखात काही न्यायमूर्तींची छायाचित्र प्रसिध्द केली होती, ज्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत चौकशी चालू होती आणि यात न्यायमूर्ती रिबेलो यांचेही छायाचित्र होते. ताज कॉरिडोर प्रकरणात मायावतींना अनुकूल आदेश झाला होता. रिबेलो यांची मायावतींशी भेट झाल्यानंतर काही दिवसांतच हा आदेश देण्यात आला. मायावतींना नोटिसा काढणाऱ्या न्यायाधीशाला बाजूला ठेवून रिबेलो यांनी संपूर्ण खटला आपल्या नियंत्रणात घेतल्याचा आरोप या लेखातून केला होता. (प्रतिनिधी)