शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

१७ जागांवर रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2017 2:14 AM

पणजी : येत्या ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच ४0पैकी १७

पणजी : येत्या ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच ४0पैकी १७ मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. गड राखण्यासाठी काही प्रस्थापितांचा संघर्षही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या गुरुवारी होत आहे. एकूण २५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्यातील ११ लाख १० हजार मतदार येत्या शनिवारी या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. काही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होतील, तर १0 मतदारसंघांमध्ये थेट लढती होणार आहेत. शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रचाराला जोर चढला आहे. १७ मतदारसंघांमध्ये कोण जिंकेल व कोण हरेल ते सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. भाजपतर्फे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २00पेक्षा जास्त कोपरा बैठका ३६ मतदारसंघांमध्ये घेतल्या. शिवाय प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांनी भाजपचा प्रचार सांभाळला. काँग्रेसतर्फे प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत व लुईझिन फालेरो यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. मगोपतर्फे सुदिन ढवळीकर, तर गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर व सुभाष वेलिंगकर यांनी बैठका घेतल्या. शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत यांनी धुरा सांभाळली. विरोधी व सत्तेतील बहुतांश उमेदवारांनी घरोघर प्रचार केला, तेव्हा लोकांनी नोकरीचीच अपेक्षा व्यक्त केली. निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा अतिशय सक्रिय केली आहे. रात्रीच्यावेळी मतदारांना पैसे किंवा भेटवस्तू वाटण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून फिरती पथके सर्वत्र फिरत आहेत. शिवाय प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून नाकाबंदीही सुरू आहे. काही भागांत लाखो रुपयांची दारू पकडली गेली आहे. दोन ठिकाणी रोख रक्कम पकडली गेली. वाणिज्य कर खात्याने तर गेल्या पाच दिवसांत १00पेक्षा जास्त मालवाहू वाहने तपास नाक्यांवर ताब्यात घेतली आहेत. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दीपक ढवळीकर, मंत्री राजेंद्र आर्लेकर, मंत्री महादेव नाईक, दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, आवेर्तान फुर्तादो, अ‍ॅलिना साल्ढाणा, आमदार जेनिफर मोन्सेरात, सिद्धार्थ कुंकळयेकर, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, राजन नाईक, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई यांच्याकडून लढविल्या जात असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा निकाल कसा लागेल, याकडे मतदारांचे लक्ष आहे. पर्वरी, कळंगुट, सांताक्रुझ, सांत आंद्रे, काणकोण, वेळ्ळी, मये, पर्ये या मतदारसंघांतील लढतीकडेही लोकांचे लक्ष आहे; कारण तिथेही काही प्रमाणात चुरस आहे. (खास प्रतिनिधी)