शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मराठी राजभाषेचा ठराव मंजूर

By admin | Updated: August 13, 2016 02:03 IST

पणजी : गोव्यात कोकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला ठराव

पणजी : गोव्यात कोकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला ठराव विधानसभेत शुक्रवारी मंजूर झाला. मात्र, सरकारने या विषयात यथोचित लक्ष घालून व जनतेशी विचार विनिमय करूनच कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी, असेही या ठरावाद्वारे ठरले आहे. सावळ यांच्या ठरावास दुरुस्ती पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मांडली होती. तीही मंजूर झाली. सरकारने गोवा राजभाषा कायदा १९८७ मध्ये त्वरित दुरुस्ती करून मराठीला देखील राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी सावळ यांची मागणी होती. त्यावर सभागृहात दोन्ही बाजूंनी खूप चर्चा झाली. भाषेच्या विषयावरून वाद नको, सावळ यांनी अगोदर विधानसभेतील सर्व मराठीप्रेमी आमदारांशी चर्चा करायला हवी होती, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले. तसेच हा ठराव मंजूर करून घेण्यास आपली काहीच हरकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तत्पूर्वी राजभाषा खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी सावळ यांच्या ठरावाला उत्तर देताना प्रशासकीय कामांमध्ये मराठी वापरली जात असून सरकार त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे व मराठीच्या उत्कर्षासाठी पुस्तक प्रकाशनासह अनेक योजना सरकार राबवत असल्याचे सांगितले. तुम्ही ठराव मागे घेणार काय, अशी विचारणा सभापती अनंत शेट यांनी आमदार सावळ यांना केली, त्या वेळी सावळ यांनी नकार दिला. तुम्ही ठराव फेटाळला तरी चालेल.