शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By काशिराम म्हांबरे | Updated: June 15, 2023 22:12 IST

संशयित व पीडितेला म्हापसा पोलीस स्थानकात आणल्यानंतर भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्ह्याखाली नागेश कोलकर यास रितसर अटक केली.

म्हापसा - म्हापसा येथील लक्ष्मीनगरातून १४ वर्षीय मुलीचे फुस लावून पळवून नेलेल्या मुलीची पोलिसांनी इटगी बिजापूरमधून सुखरूप सुटका केली. याप्रकरणी संशयित आरोपी नागेश उर्फ संजू लालसाब कोलकर (२३, रा. लक्ष्मीनगर व मूळ बिजापूर) यास अटक केली.हा अपहरणाचा कथित प्रकार गेल्या १० जून रोजी घडला होता. पीडितेच्या आईने त्याच दिवशी दुपारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करुन घेतला होता.

संशयित पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन आपल्या मूळ गावी व्यंकटेश्वरनगर, बासवन, बिजापूर-कर्नाटक येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार म्हापसा पोलीस पथक कर्नाटकला रवाना झाले. मात्र संशयित आपल्या घरी नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत संशयिताने पीडितेला इटगी बिजापूर येथे ठेवल्याची माहिती मिळाली. बुधवारी १४ जून रोजी पोलिसांनी तेथे जाऊन संशयिताला पकडले व पीडितेची सुटका केली.

संशयित व पीडितेला म्हापसा पोलीस स्थानकात आणल्यानंतर भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्ह्याखाली नागेश कोलकर यास रितसर अटक केली. संशयिताला म्हापसा न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, पीडितेची गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल आल्यावर अजून गुन्ह्याखालील आवश्यक कलमे जोडण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, रिचा भोंसले, यशवंत मांद्रेकर, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, आनंद राठोड, प्राजक्ता झालबा या पथकाने ही कामगिरी केली.