शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 08:53 IST

पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या टुरीस्ट फेरीबोटीतून २४ पर्यटक व २ बोटीवरील कर्मचारी जलसफारीसाठी निघाले होते...

पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते.

पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या टुरीस्ट फेरीबोटीतून २४ पर्यटक व २ बोटीवरील कर्मचारी जलसफारीसाठी निघाले होते. भर समुद्रात बोट पोहचली असतानाच अचानक ढग दाटून वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे बोट चालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. खळवलेल्या समुद्रात अडकल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला. त्याचवेळी समुद्रात गस्त घालणाऱ्या तटरक्षक दलाच्या ‘सी १४८’ या जहाजाला ही पर्यटकांची बोट दिसली व त्यातील जवांनानी बोटीच्या दिशेने जात बचावकार्य सुरू केले. 

जीव वाचविल्याबद्दल मानले आभारभर समुद्रात अडकलेल्या आपत्कालीन स्थितीतून सुखरुपरित्या बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल ‘नेरुल पॅराडाईज’ या पर्यटन फेरीबोटीच्या प्रवक्त्यांनी तटलक्षक दलाचे आभार मानले आहेत.

बोटीतील इंधन संपले अन् संकट झाले गडद- रविवारी संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३० असे दोन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’  चालले. फेरीबोटीतील इंधन संपल्याने समुद्रातच ही फेरीबोट बंद पडली. त्यामुळे संकट अधिक गडद झाले. - भारतीय तटरक्षक ही भारत सरकारची सागरी, किनारी सुरक्षा मजबूत करते. प्रतिकूल हवामानात बचाव कार्य करुन पर्यटकांचा जीव भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवल्याने त्यांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन