लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पूर्वी देशात ब्रिटिशांच्या मनात येईल तसाच विकास केला जात होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर भारतीयांना जो विकास अपेक्षित आहे, तो विकास घडवून आणला गेला. स्वातंत्र्यसैनिकांच्या कष्टामुळे आणि बलिदानामुळे आपण देशाचा विकास करू शकलो, हे प्रत्येकाने हृदयात ठसवून ठेवले पाहिजे. विकासाचे नवे आयाम आज पाहायला मिळत आहेत. आता जगानेही भारताची वाढलेली ताकद मान्य केली आहे. जागतिक क्षेत्रात देशाचा मानसन्मान वाढलेला आहे, असे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील ऐतिहासिक क्रांती मैदानावर राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर मंत्री नाईक बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सरकार आपल्या देशाचा चौफेर व उल्लेखनीय विकास साधण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चांगले काम करीत आहेत. राज्यानेही विकासाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती केली आहे. लोकांनी शांतता व सलोखा राखून विकासासाठी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. विकास कामांसाठी लोकांचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे असते.
सुरुवातीस कृषिमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलिस पथकाच्या संचलनाची त्यांनी पाहणी केली. फोंडा व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. समारंभाला अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, पोलिस उपाधीक्षक शिवराम वायंगणकर, लष्करी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक, सरकारी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व इतर उपस्थित होते. गिरीश वेळगेकर यांनी सूत्रसंचालन केले.
विकासाचे श्रेय डबल इंजिन सरकारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत गोव्याच्या जलद पायाभूत सुविधांच्या विकासाचे श्रेय डबल इंजिन सरकारला दिले. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे नेते आहेत, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.
प्रजासत्ताक दिनातून दिसते विविधतेत एकता : सिक्वेरा
प्रजासत्ताक दिन विविधतेतील एकतेच्या भावनेला मूर्त रूप देतो, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातआयोजित प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना सिक्वेरा यांनी भारतीय संविधानाच्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाची तत्त्वे अधोरेखित केली, जी राष्ट्राला मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी नमूद केले की, यावर्षीचा उत्सव हा सुवर्ण भारत, वारसा आणि प्रगती या संकल्पनेवर आहे. जे देशाच्या उपलब्धी आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात प्रमोद सावंत सरकार चांगले काम करत आहे. लोकांनी विकास कामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी मंत्री सिक्वेरा यांनी केले. यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री सिक्वेरा यांनी पोलिस, होमण्डस आणि विद्यार्थ्यांच्या पथकांकडून मान्यवंदना स्वीकारली व पाहणी केली. यावेळी परिसरातील विद्यालयांच्या पथकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद दिला.