शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भंगार अड्डे वस्त्यांमधून हटवणार; इतर ठिकाणी २ महिन्यात जागा शोधणार

By किशोर कुबल | Updated: March 1, 2024 14:40 IST

आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन महिन्यात जागा शोधणार

पणजी - भंगार अड्डे वस्त्यांमधून हटवण्यासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. आयडीसीचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दोन महिन्यात जमिनींचा शोध घेण्यास सांगण्यात आले असून या जमिनी महसूल खाते संपादित करून आयडीसीच्या ताब्यात देणार आहे.

भंगार अड्यांच्या बाबतीत महत्त्वाची बैठक शुक्रवारी झाली.  बैठकीला उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार रेजिनाल्द लॉरेन्स व इतर उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. रेजिनाल्द यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जमिनींचा शोध घेतल्यानंतर त्या महसूल खात्याकडून संपादित केल्या जातील व आयडीसीला दिल्या जातील. ज्या भागात जास्त भंगार अड्डे आहेत त्या भागात जास्त जमीन तब्यात घेतली जाईल. सध्या महामार्गांलगत तसेच इतरत्र भंगार अड्डे पसरलेले आहेत. हे सर्व भंगार अड्डे बेकायदा आहेत. लोकांना त्याचा त्रास होत असल्याने ते हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांना जागा देऊन योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल.'

८०० हून अधिक भंगार अड्डे नोंदणी नसलेले - बाबूश मोन्सेरातमहसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले की, केवळ २६९ भंगार अड्डे नोंदणीकृत आहेत. ८०० हून अधिक भंगार अड्डे नोंदणी केलेले नाहीत. त्यांना आधी नोंदणी करावी लागेल. महसूल खाते या भंगार अड्ड्यांसाठी जमिनी तब्यात घेऊन आयडीसीला देईल. आयडीसीनेच सुविधा व इतर गोष्टी निर्माण करावयाच्या आहेत. यापुढे एकही भंगार अड्डा वस्तीमध्ये दिसणार नाही हे आम्ही पाहू, अशी ग्वाही बाबूश यांनी दिली