शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनसोड्यावरील ४० हजार टन कचर्‍याचे रेमेडिएशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:38 IST

प्रकल्पात साठलेला कचराही दूर करण्यास सुरवात: कामाला गती 

मडगाव: सोनसोडो कचरा यार्डात साठून असलेला कचर्‍याचा डोंगर कमी करण्याच्या कामाला आता गती आली असून सुमारे ४०  हजार टन कचरा रेमेडियेशन पद्धतीने साफ केला असून पावसापूर्वी किमान १२०  हजार टन कचरा या पद्धतीने साफ केला जाईल अशी आशा पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी स्वता जाऊन या कामाची पाहणी केली. दरम्यान कचरा प्रक्रिया प्रकल्पात जो कचरा साठून होता त्याचेही रेमेडिएशन चालू असून सुमारे ३० ट्रक कचरा काढून टाकला असून येत्या आठ दिवसात हा साठून असलेला हा सारा कचरा साफ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोनसोडोच्या या प्रकल्पात सुमारे १०० टन कचरा साठून होता. सध्या तो उचलण्यासाठी प्रकल्पातील क्रेनसह एका जेसीबी मशीनचा वापर सुरू केला आहे. हा कचरा पुर्णपणे साफ झाल्यानंतर नव्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान सुक्या कचर्‍याच्या बेलिंगच्या कामालाही सुरवात झाली आहे.मागच्या मे महिन्यात सोनसोडयावरील कचर्‍याला आग लागल्यानंतर ह्या साठलेल्या कचर्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने हा कचरा त्वरित कमी करा असा आदेश दिल्यानंतर रेमेडिएशन प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या यार्डात सुमारे तीन लाख टन कचरा साठून होता.दरम्यान मंगळवारी कचर्‍याला जिथे आग लागली होती तेथील कचरा पोकलीनच्या सहाय्याने बाजूला काढून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली. सध्या गरमी वाढू लागल्याने  खबरदारीचा उपाय म्हणून माती टाकण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी संगितले.