शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गोव्यात सोमवारपासून धार्मिक स्थळे खुली होण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 21:05 IST

गोव्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; आज २०० हून अधिक रुग्ण सापडले

मडगाव: सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला असला तरी गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बहुतेक धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुतेक मंदिर समित्यांचा कल तसाच दिसत आहे. गोव्यातील मशिदी 30 जून पर्यंत बंद राहणार आहेत तर चर्च उघडण्या संदर्भात सरकारी निर्णयानंतर निर्णय घेणार असल्याचे चर्च संस्थेने सांगितले आहे.

गोव्यात मंदिरात भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ही मंदिरे लोकांसाठी बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याची मंदिर समित्यांची सध्या तरी तयारी नाही. कवळे फोंडा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा देवस्थानाच्या समितीची शनिवारी बैठक होऊन 30 जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

फातरपा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा कुंकळीकारीण देवस्थानाचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हे मंदीर भाविकांसाठी उघडणार नसून राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन पुढच्या रविवारी काय तो निर्णय घेण्याचे समितीने ठरविले आहे. जवळच्या शांतादुर्गा फातरपेकरीण देवस्थानाचे अध्यक्ष दिलखूष देसाई यांनीही मंदिर खुले करण्या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगितले. कोणकोणच्या प्रसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात सोमवारपासून भाविकांना केवळ देवदर्शन घेता येणार आहे पण प्रदक्षिणा आणि तीर्थ प्राशनासह कोणतेही विधी करता येणार नसल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

गोव्यात सर्वात जास्त मंदिरे फोंडा परिसरात असून या परिसरातील सहा मंदिर समित्यांची उद्या रविवारी सकाळी महत्वपूर्ण बैठक म्हार्दोळच्या प्रसिद्ध म्हाळसा मंदिरात होणार आहे. या बैठकीत फोंडा परिसरात असलेल्या म्हाळसा, रामनाथ, नागेश, महालक्ष्मी, देवकीकृष्ण आणि कामाक्षी या मंदिरातील समिती अध्यक्षासह जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानाचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. मंदिरे भाविकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत. यापूर्वी वैष्णव सारस्वत समाजाचे मुख्य पिठाधिश विद्याधिराज स्वामी यांनी यापूर्वी आपल्या पिठाच्या अखत्यारीतल्या सर्व मंदिरांना डिसेंम्बर पर्यंत धार्मिक उत्सव आणि अन्नसंतर्पणे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

चर्च व मशिदीही बंदच असणारशासनाने सोमवार पासून धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली असली तरी सध्याच्या स्थितीत चर्चही काही काळ भाविकांसाठी बंदच राहणार अशी माहिती मिळाली आहे. सरकारची मार्गदर्शक तत्वे आल्यानंतरच चर्च निर्णय घेणार असल्याचे ठरविले आहे.

अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेनेही 30 जूनपर्यंत गोव्यातील सर्व मशिदी बंद राहणार असल्याचे कळविले आहे. तोपर्यंत नित्याचे 5 नमाज आणि शुक्रवारचा नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या