शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापितांचे पुनर्वसन करा

By admin | Updated: April 20, 2015 01:35 IST

वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे

वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे सरकारने पुनर्वसन करावे, अशी मागणी बायणा येथील विस्थापित होणाऱ्या रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केली.काटेबायणा येथील मच्छीमार समाजाच्या नेत्या कारिदाद परेरा यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रपरिषद घेण्यात आली. या वेळी प्रकाश राठोड, नझिमा खान आदी उपस्थित होते. या वेळी कारिदाद परेरा यांनी आम्ही या ठिकाणी पोर्तुगीज काळापासून मच्छीमारी व्यवसाय करीत असून येथील काही रहिवासी पन्नास वर्षांपासून स्थायिक झालेले आहेत. यातील काही लोकांचे जन्मही येथेच झाले असल्याने ते जाती-धर्माने जरी परप्रांतीय असले तरी कायद्याने गोव्याचे नागरिकच आहेत. त्यांची घरे जरी बेकायदेशीर असली तरी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. सरकारने आपली विकासकामे करताना कुणाच्याही पोटावर येऊ नये किंवा त्यांना बेघर करू नये, असे त्यांनी सांगितले. वर्षभर न्यायालयीन पाठपुरावा का केला नाही, असे विचारले असता न्यायालयीन लढा देण्यासाठी निवडलेल्या वकिलांनीच विश्वासघात केला, असे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत आमदार मिलिंद नाईक यांनी घरे कायदेशीर करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)