शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खाणमालकांना विक्रमी सवलत

By admin | Updated: May 9, 2015 02:19 IST

पणजी : राज्यातील खनिज लिजांची नोंदणी, मंजुरी, नूतनीकरण व हस्तांतरण शुल्क हे स्टॅम्प ड्युटीच्या तुलनेत १०० टक्के असावे,

पणजी : राज्यातील खनिज लिजांची नोंदणी, मंजुरी, नूतनीकरण व हस्तांतरण शुल्क हे स्टॅम्प ड्युटीच्या तुलनेत १०० टक्के असावे, असा यापूर्वी पर्रीकर सरकारने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शुक्रवारी फिरविला व प्रमाण केवळ ५ टक्क्यांपर्यंत खाली आणले. खनिज व्यावसायिकांनी १०० टक्के शुल्क भरण्यास नकार दिल्याने अखेर सरकारला एक पाउल मागे घ्यावे लागले.काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खनिज निर्यात करात २० टक्क्यांनी कपात करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता राज्य सरकारने लिज नोंदणी शुल्कात ९५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला. खनिज व्यावसायिक यामुळे खुश झाले; पण यापूर्वी पर्रीकर सरकारने जो १ हजार २०० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित धरला होता, तो आता बुडाला आहे.मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी सरकारने स्टॅम्प ड्युटी जेवढी असेल, तेवढे नोंदणी शुल्क खाण व्यावसायिकांना भरणे सक्तीचे केले होते; पण ते केवळ कागदोपत्रीच राहिले. १०० टक्के शुल्क भरायला लावण्याची अट ही नजरचुकीने लागू करण्यात आली होती. खाण व्यावसायिकांनी ती मान्य केली नाही व कुणीच शुल्क भरले नाही. यामुळे आम्ही आता शुल्काचे प्रमाण १०० वरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. (खास प्रतिनिधी)