शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ये बारिश का मौसम!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 05:16 IST

रिमझिम पाऊस म्हटलं की, ओठी गाणं अन् हातात मस्त गरमागरम चहा येतोच...शिवाय या पावसात ओलं चिंब होऊन कांदा भजी खाण्याची मजाच काही और

- Aboli Kulkarniरिमझिम पाऊस म्हटलं की, ओठी गाणं अन् हातात मस्त गरमागरम चहा येतोच...शिवाय या पावसात ओलं चिंब होऊन कांदा भजी खाण्याची मजाच काही और असते नाही का? आपण प्रत्येकच जण या पावसाळी ऋतूची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो. कधी एकदा पावसाळा सुरू होतो आणि आपण मनमुरादपणे आपल्या आवडीनिवडींच्या गोष्टींचा आनंद लुटू शकतो, असं आपल्याला मनोमन वाटत असतं. तुम्हाला माहितीय का, आपल्याप्रमाणेच बॉलिवूडच्या तारे-तारकाही या पावसाची खूप वाट पाहत असतात. पाहूयात, मग कोण आहेत हे स्टार्स ज्यांना पावसाळी वातावरणात काय काय नवीन करावंसं वाटतं ते... ‘कॉफीचा मग’ अन् देसी गर्ल...बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिला पावसाचा आनंद लुटायला प्रचंड आवडतं. तिला या वातावरणात काम करण्याची बिल्कुल इच्छा नसते. अशावेळी ती तिच्या म्युझिक सिस्टीमवर पावसाचे जुने-नवे गाणे लावते आणि ‘कॉफीचा मग’ हातात घेऊन खिडकीत तास न् तास बसून राहते. आता रिमझिम पावसात कुणाला काम करावेसे वाटेल, नाही का?अतरंगी रणवीरच्या हरकती...रणवीर सिंह हा बॉलिवूडमध्ये त्याच्या अतरंगी हरकतींमुळे ओळखला जातो. एकदम बिनधास्त आणि मनमौजी अशा रणवीरचे पावसाळा प्रेमही वेगळेच आहे. इतरांना मस्त पावसांत भिजावेसे वाटते. हा मात्र पाऊस पडत असताना घरात बेडरूममधील अंथरूणात घुसून बसतो. बेडवर चादर अंगावर घेऊन लोळणे त्याला प्रचंड आवडते.मस्सकलीची फेव्हरेट ‘पावभाजी’पावसाळा आणि रोडलगत ठेल्यावरची पावभाजी हे सोनम कपूरसाठी समीकरणच आहे. पाऊस पडत असताना तिला कु ठल्या फाईव्ह स्टारमधील नव्हे तर जुहूच्या एखाद्या साधारण पावभाजी सेंटरहून पावभाजी खाण्याचा मोह होतो. मग अशावेळी ती थेट गाडी घेऊन निघते आणि जुहूला चटपटीत पावभाजीचा आस्वाद घेते. लहानपणीही ती तिची आई सुनीतासोबत पावभाजी खायला जात असे. रणबीर लाइक्स ‘रेनी फुटबॉल’संपूर्ण मुंबईत पावसाची धूम असताना रणबीर कपूरला घरात बसून चक्क चेस खेळायला आवडते. त्यासोबतच त्याला पावसात चिंब भिजून फुटबॉल खेळण्याची मजाच काही और वाटते, असे तो सांगतो. पावसाळा सुरू झाला की, रणबीर कपूरला स्वत:वर कंट्रोल राहत नाही. त्याला मस्त मजा कराविशी वाटते. ंआलियाचे ‘फ्रेंच फ्राईज’ पे्रम...बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिची तिच्या नटखट स्वभावाप्रमाणेच वेगळी आवड आहे. तिला बाहेर पाऊस सुरू असताना घरात टीव्हीसमोर बसून फ्रेंच फ्राईजची मजा लुटायला आवडते. त्यासोबतच ते जर तिच्या आईच्या हातचे असतील मग काय विचारायलाच नको? आलिया खूप खुश होऊन जाते. दीपिका लव्हज ‘थाई करी’दीपिका पदुकोणसाठी पाऊस आणि थाई फूड हे आगळेवेगळे समीकरणच बनलेले आहे. ती संपूर्ण पावसाचा सीझन थाई फू ड खाण्यासाठी तिचे डाएट देखील थोडे सैल करते. वर्षभर जी दीपिका इडली खात असते ती अचानक पावसाळा सुरू झाला की, थाई फूडवर तुटून पडते.