शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कूळ-मुंडकार प्रकरणी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 17, 2015 03:48 IST

पणजी : कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती येत्या विधानसभा अधिवेशनात मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला

पणजी : कूळ-मुंडकार कायद्यातील दुरुस्ती येत्या विधानसभा अधिवेशनात मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे महासचिव यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुळांना व मुंडकारांना न्यायालयाची वाट दाखविणाऱ्या या कायद्यातील दुरुस्ती ताबडतोब रद्द करण्यात याव्यात आणि मुख्य करून सनसेटचे कलम रद्द करण्यात यावे, असे नाईक यांनी म्हटले आहे. येत्या गोवा विधानसभा अधिवेशनात या संबंधी दुरुस्ती विधेयक आणले जावे व करण्यात आलेल्या दुरुस्ती रद्द करण्यात याव्यात. अन्यथा काँग्रेस पक्ष या प्रकरणात मोठे आंदोलन छेडणार आहे. येत्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदारही या प्रकरणात सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील भाजप सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जाचक भूमी अधिग्रहण विधेयक आणले आहे आणि राज्य सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात अन्यायकारक दुरुस्ती केल्या आहेत. भूमी अधिग्रहण विधेयकामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दावा हा शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याची टीका नाईक यांनी केली. युपीए राजवटीत सरकारने भूमि अधिग्रहणासंदर्भात पुनर्वसन, भरपाई, पारदर्शकता आणणारी दुरुस्ती केली होती व तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्याला पाठिंबा दिला होता. आता हीच भाजपा सत्तेवर आल्यानंतर युपीएचा कायदा चुकीचा असल्याचे सांगत असल्याचे ते म्हणाले.