शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काही टुरिस्ट गाईड बनले वेश्या दलाल

By admin | Updated: July 20, 2015 01:13 IST

गोव्यातील काही टुरिस्ट गाईड हे एस्कॉर्ट वेश्या व्यवसायातील २५ टक्के दलालीचे भागीदार बनल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शनिवारी (दि.१८) रात्री गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या

वासुदेव पागी ल्ल पणजी गोव्यातील काही टुरिस्ट गाईड हे एस्कॉर्ट वेश्या व्यवसायातील २५ टक्के दलालीचे भागीदार बनल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शनिवारी (दि.१८) रात्री गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या कारवाईत हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. या प्रकरणात काही टुरिस्ट गाईडना अटक होण्याची शक्यताही आहे. हे टुरिस्ट गाईड गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची वेश्या व्यवसायातील दलालांशी भेट घालून देतात. त्यानंतर ठराविक रक्कम देण्याच्या हमीवर त्यांना ठराविक जागेवर युवती पुरविली जाते. त्या ठिकाणी युवतीसह असलेल्या दुसऱ्या दलालाला ही रक्कम दिली जाते व युवतीला घेऊन पर्यटक जातात. या कामात गिऱ्हाईकाने दिलेल्या रकमेतून युवती व दलालांना दलाली ही मिळतेच; परंतु टुरिस्ट गाईडलाही चांगली दलाली दिली जाते. काही टुरिस्ट गाईड हे वेश्या दलालांसाठी काम करतात, तर काही वेश्या दलाल टुरिस्ट गाईड बनून दलाली करीत असतात, अशी माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली. स्वत:ला टुरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱ्या आणि प्रत्यक्ष पर्यटकांना दलालांकडे नेणाऱ्या काही संशयितांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. अटक केलेल्या दलालांशी या तथाकथित गाईडची चांगली ओळख आहे व त्यांचे आपसात व्यवहारही आहेत. स्पामध्ये एका पर्यटकाला या गाईडने आणले तर त्या स्पामधून त्याला १ हजार रुपये दलाली दिली जाते. एस्कॉर्ट वेश्या व्यवसायात ही दलाली २० ते २५ टक्के आहे. येत्या काही दिवसांत त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.