शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भूमिकेवरून गोव्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:37 IST

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

पणजी : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. पर्रीकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने या भूमिकेला आक्षेप घेतला आहे.गोवा फॉरवर्ड पक्षाचे मंत्री विजय सरदेसाई म्हणतात की, मगोप हा जुना पक्ष आहे. वयोमानाप्रमाणे एखाद्याला विस्मरण होते. तसे असेल तर दिल्लीत आम्ही भाजपाबरोबर रालोआत एकत्र आहोत याचे स्मरण मगोपला करून द्यावे लागेल. या अनुषंगाने सरदेसाई यांनी गेल्या एप्रिलमधील सर्व घटक पक्षांच्या दिल्लीवारीचा व तेव्हा रालोआच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मगोपचे सर्वेसर्वा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर व स्वत: आपला अशा तिघांच्या फोटोंचाही उल्लेख केला आहे. रालोआत मगोप घटक नव्हता, तर रालोआच्या होर्डिंगवर ढवळीकर यांचा फोटो कसा, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.>मगोपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी होत असून २0१९ची लोकसभा निवडणूक पक्षाने स्वतंत्रपणे लढवावी की नाही, हा विषयी होणार आहे. पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मगोप रालोआचा घटक नसल्याचा पुनरुच्चार केला.>सोमवारी होत असलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत ठराव घेतला जाण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ‘गरज भासेल तेव्हा त्याबाबत बघू,’ असे उत्तर ढवळीकर यांनी दिले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर