शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या किनारपट्टीत परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांचा सुळसुळाट; पर्यटकांची लूट

By किशोर कुबल | Updated: September 3, 2023 15:41 IST

मुख्यमंत्री गरजले : तक्रार करा, एकेकावर कारवाई करतो

किशोर कुबल, पणजी : गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्के परप्रांतीय गुन्हेगार असतात असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यानंतर आज असेच आणखी एक विधान करताना गोव्याच्या किनारी भागांमध्ये परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांनी दवाखाने उघडून विदेशी पर्यटकांची लूट चालवली असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘याबाबतीत कोणीही पुढाकार घेऊन लेखी तक्रार केल्यास सरकार या बोगस डॉक्टरांविरुध्द कडक कारवाई करील.येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित अखिल भारतीय दंत चिकित्सक संघटनेच्या गोवा शाखेच्या १८ च्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले कि, ‘गोव्याचे पर्यटन आता ‘सन, सॅण्ड अॅण्ड सी’ या पुरतेच मर्यादित राहिलेले नसून मेडिकल टुरिझमच्यादृष्टीनेही फोफावत आहे. याचाच फायदा काही परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांनी घेतला आहे. ते गोव्याच्या किनारी भागात दवाखाने थाटतात आणि विदेशी नागरिकांना लुटतात.’मुख्यमंत्री म्हणाले की,‘ तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे., ही चिंतेची बाब आहे.

सरकारी दंत महाविद्यालयात निदान व उपचारांची सोय आहे. दंत चिकित्सकही ओरल कॅन्सरचे निदान करण्याबरोबरच रुग्णांचे समुपदेशन व उपचार याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.’ मुख्यमंत्री म्हणाले की,‘कोविड महामारीच्या काळात सर्वात मोठे झळ दंत चिकित्सकांना बसली. डॉक्टरांनी पीपीई किट वगैरे घालून त्यावेळी शस्रक्रिया केल्या. दंत चिकित्सक माणसाच्या चेहय्रावर हास्य फुलविण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. डॉक्टरांच्याही चेहय्रावर नेहमीच हास्य फुलले पाहिजे. सरकार दंत चिकित्सकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. दंत महाविद्यालयात अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाय्रांमध्ये ७० ते ८० टक्के महिला असतात ही उल्लेखनीय बाब आहे.’

संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. राजन लांबोर, मानद सचिव डॉ. ओंकार शेट्ये, आयोजन अध्यक्ष डॉ. फ्रान्सिस अक्कारा, सचिव डॉ. शाल्मली वीराज धोंड तसेच राज्यातील दंत चिकित्सक उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत