शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

केरीतील गर्भवतीचा खून

By admin | Updated: June 6, 2014 01:55 IST

वाळपई : धनगरवाडा, केरी येथील भाग्यश्री ऊर्फ गुलाबी जानू झोरे हिचा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याची शक्यता आहे.

वाळपई : धनगरवाडा, केरी येथील भाग्यश्री ऊर्फ गुलाबी जानू झोरे हिचा खून चारित्र्याच्या संशयावरून झाल्याची शक्यता आहे. भाग्यश्रीचा पती संशयित जानू झोरे यास वाळपई पोलिसांनी गजाआड केले आहे. भाग्यश्री हिचा बुधवारी सायंकाळी ६ वाजता तिच्याच घरात कोयत्याने वार करून खून झाला होता. तो अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. शवचिकित्सेनंतर तिचा मृत्यू धारदार कोयत्याने वार केल्यानेच झाल्याचे व ती गरोदर असल्याचे अहवालात म्हटले आहे. भाग्यश्री ही साखळी येथे घरकामाला होती. ती सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असे. बुधवारीदेखील ती सायंकाळी ५.३०च्या दरम्यान घरी आली होती. तिचे व पती जानू यांचे पटत नव्हते. त्यामुळे दररोज दोघांची भांडणे होत. जानू तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांत भांडणे होत होती. तिच्या दिराचे आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्यानिमित्ताने मंगळवारी त्याच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी भाग्यश्री व जानू यांचे जोरदार भांडण झाले होते. बुधवारी सायंकाळी भाग्यश्री घरी आल्यानंतर भांडणाची पुनरावृत्ती झाली. दोघांचे जोरदार भांडण झाले आणि अचानक जोरात आवाज आला. तो आवाज ऐकू आल्यानंतर जानूची बहीण तिथे धावून गेली. तिला भाग्यश्री रक्ताच्या थारोळ््यात खाली पडल्याचे दिसले. तिने १०८ रुग्णवाहिकेला बोलविले असता तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक दिनराज गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी घटनेचा पंचनामा केला. संशयिताने अजूनही खुनाची कबुली दिलेली नाही. गुरुवारी त्याला डिचोली न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. भाग्यश्री हिला साईश हा तीन वर्षांचा मुलगा आहे. भाग्यश्री व जानू यांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात पटत नव्हते. यापूर्वी केरी आउटपोस्टवरही तक्रारी दाखल झाल्या होत्या. बुधवारी ही घटना घडल्यानंतर जानू यानेच केरी आउटपोस्टवर जाऊन ही माहिती पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)