शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: March 7, 2017 01:45 IST

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने

टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरीपणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने तातडीने मंगळवार, दि. ७ रोजी पणजीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एकंदरीत, आतापर्यंतच्या टपाल मतदानाचे भवितव्यच अनिश्चित व अधांतरी बनले आहे.मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आल्तिनो येथील कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारीही या बैठकीस उपस्थित असतील. टपालाद्वारे झालेले मतदान रद्द केले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश भोसले यांच्या शिष्टमंडळाने सर्व विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी, निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती व आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या शिष्टमंडळाला सोमवारी वेळ दिली होती. दुपारी साडेबारा वाजता आयोगाने चोडणकर व भोसले यांच्याकडून सर्व मुद्दे, अडचणी व समस्या ऐकून घेतल्या. एक तास त्यांनी चर्चा केली. आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्दे आयोगास पटल्याचे भोसले यांनी दिल्लीहून ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही टपाल मतदानाबाबत तसेच सिरीयल नंबरची माहिती बाहेर फोडली जात असल्याविषयी व अन्य विषयांबाबत ज्या काही शंका उपस्थित करत होतो, त्या शंका मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीत आयोगाकडे पोहोचवतच नव्हते, असाही आम्हाला आता दाट संशय येत असल्याचे भोसले म्हणाले.निवडणुकीची ड्युटी बजावलेल्या साडेसतरा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना मतपत्रिका दिल्या गेल्या. सरकारी कर्मचारी मुक्तपणे मतदान करूच शकत नाहीत. त्यांच्यावर दबाव येतो; कारण सिरीयल क्रमांक बाहेर फोडला गेला आहे. तो क्रमांक उमेदवारांना व आमदारांना कळल्यामुळे त्यांच्या मतदानाच्या गुप्ततेविषयीही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आतापर्यंतचे टपाल मतदान रद्द करून एकाच दिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे सर्व साडेसतरा हजार कर्मचाऱ्यांचे मतदान घ्या, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याचे चोडणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. (खास प्रतिनिधी)