शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगीजधार्जिणे मराठीला ठरतात अडसर: सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:35 IST

दवर्ली येथे मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा; मराठी वोटबॅक निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात अजूनही पोर्तुगीजधार्जिणे लोक अस्तित्वात असून ते मराठीला विरोध करत आहेत. त्यामुळे दोन वर्षात मराठी मतपेढी बळकट करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले. मडगाव प्रखंडाच्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते.

दवर्ली येथील दुर्गा देवीच्या मंदिर सभागृहात शनिवारी संध्याकाळी मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा झाला. व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, राज्यात मराठी संस्कृती, मराठी वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, आरती, पूजा, पत्रव्यवहार हे सर्व मराठीतूनच होत आहे. असे असूनही मराठी भाषेवर अन्याय होत आहे.

वेलिंगकर यांच्या मराठी राजभाषा करण्याच्या प्रयत्नांना लोकांनी साथ द्यायला पाहिजे, असे मत यापूर्वी, गो.रा. ढवळीकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा ही संतांची भाषा असून ती एक समृद्ध भाषा असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सर्वच ठिकाणी मराठीतूनच व्यवहार व्यायचा. कोंकणी जरी काही लोकांमुळे राजभाषा झाली तरीही ती कुठेही व्यवहारात वावरली जात नाही. आम्ही कोंकणी भाषेला बोली भाषाच मानतो, असे ढवळीकर म्हणाले.

तरच सरकारवर येईल दबाव

काही पोर्तुगीजधार्जिणे लोक अजूनही गोवा हा वेगळा प्रदेश म्हणतात. तो एक स्वतंत्र देशच म्हणून ओळखला जावा म्हणून काहींनी तर युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेला निवेदन, पत्रही लिहिले आहे. हेच लोक मराठी संस्कृतीला मारक ठरत आहेत. मराठी मतपेढी बळकट केल्यास सरकारवर मराठी राजभाषा करण्यास दबाव येईल.

युवकांचे मेळावे घेणार

वेलिंगकर यांनी, मडगाव प्रखंडातील मराठीप्रेमींना, जो पक्ष आणि उमेदवार मराठीला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करायला आणि त्याच्याकडून मराठी राजभाषा करण्यास वचनबद्ध राहण्याची अट घालण्यास सांगितले. यापुढे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संमेलने होतील आणि मराठी ऐक्य साधले जाईल.

'रोमी ही भारतीय लिपीच नाही'

या कार्यक्रमात नंतर, मराठीप्रेमींनी मराठी राजभाषा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना वेलिंगकर म्हणाले की, सासष्टी तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात कोंकणी रोमी लिपीला राजभाषा म्हणून स्थान मिळावे अशी चळवळ सुरू आहे. मुळात रोमी ही भारतीय लिपिच नाही आणि त्यामुळे त्या लोकांची ही मागणी चुकीची आहे. आम्ही रोमि लिपीला कदापि राजभाषा दर्जा देण्यास मान्य होणार नाही. मराठी भाषेमुळेच गोव्यात भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे, असे वेलिंगकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmarathiमराठीPoliticsराजकारण