शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

खाणप्रश्नी लोकांची फसवणूक राजकारण्यांनीही हेरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:50 IST

गोव्यातील खनिज खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आतापर्यंत लोकांना व विशेषत: हजारो खाण अवलंबितांना खोटेच सांगितले जात असल्याचे आता गोव्यातील काही राजकारण्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे.

पणजी : गोव्यातील खनिज खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आतापर्यंत लोकांना व विशेषत: हजारो खाण अवलंबितांना खोटेच सांगितले जात असल्याचे आता गोव्यातील काही राजकारण्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे. यामुळे काही राजकीय नेते आता संतप्तपणे या विषयावर भावना मांडू लागले आहेत. कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, उपसभापती मायकल लोबो आदींनी जाहीरपणे या विषयावरून जळजळीत सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.राज्यातील खनिज खाण धंदा सुरू करण्यासाठी गोवा सरकारच्या पातळीवरून व गोव्याच्या खासदारांच्याही पातळीवरून मोठेसे प्रयत्न झाले नाहीत, असे विरोधी काँग्रेस आमदार व काही भाजप आमदारही खासगीत बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गेले साडेआठ महिने आजारी राहिल्याने व कुणाकडेच मुख्यमंत्रिपदाचा ताबा न दिल्याने खनिज खाण धंद्याचा विषय अत्यंत जोरदारपणे केंद्राकडे मांडलाच गेला नाही. केंद्राने केवळ नावापुरती या विषयाची दखल घेतली. एमएमडीआर कायदा दुरुस्त करावा की गोव्याने सर्वोच्च न्यायालयात जावे या विषयावर चर्चा करण्यातच अगोदर सात महिने गेले. प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणे केंद्र सरकारला निवेदने देतो पण एकत्रित प्रयत्न होत नाहीत. गोव्यातील राजकीय विषयावरून भाजपचे खासदार अमित शहा यांना भेटतात पण निव्वळ खाणप्रश्नीच बोलण्यासाठी शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील खासदारांना व गोव्याच्या मंत्र्यांना मिळत नाही. तरीही खाणी आता लवकरच सुरू होतील, असे भाजपच्या काही नेत्यांकडून लोकांना सांगितले जात आहे.मंत्री गावडे यांनी मात्र मंगळवारी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले, की या नोव्हेंबर महिन्यात खनिज खाणी सुरूच होणार नाहीत. गोव्याचा खाण व्यवसाय सुरू होण्यासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागेल. मंत्री गुदिन्हो यांनी सोमवारी भाजपची बैठक खाणप्रश्नावरून गाजवली. खाणी सुरू होण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, अन्यथा लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाची अडचण होईल, असा इशारा गुदिन्हो यांनी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार लोबो यांनीही गुदिन्हो यांना पाठिंबा दिला व गोव्याचा खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नाही, असा मुद्दा मांडला. शेवटी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आपण सगळेजण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयावरून भेटू या, असे भाजपच्या चारही मंत्र्यांना सांगितले आहे. प्रत्यक्षात तेंडुलकर यांना पंतप्रधानांची अपॉइन्टमेन्ट तरी मिळेल काय हा मोठा प्रश्न आहे, असे काही आमदार बोलतात.