शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारेकर्‍यांच्या यादीत मावजो यांचे नाव आढळल्यानेच पोलीस संरक्षण : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:04 IST

< p >पणजी: गौरी लंकेश यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांच्या यादीत प्रसिद्ध कोकणी साहित्यिक तथा विचारवंत दामोदर मावजो यांचे नाव आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने सतर्क केले आणि त्यावरूनच मावजो यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत दिली.या प्रकरणात सनातन संस्थेकडे संशयाची सुई जात असल्याने तसेच ...

<p>पणजी: गौरी लंकेश यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांच्या यादीत प्रसिद्ध कोकणी साहित्यिक तथा विचारवंत दामोदर मावजो यांचे नाव आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने सतर्क केले आणि त्यावरूनच मावजो यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत दिली.या प्रकरणात सनातन संस्थेकडे संशयाची सुई जात असल्याने तसेच सनातनचे मुख्यालय गोव्यात असल्याने या संस्थेची कसून चौकशी करावी, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विधानसभेत शून्य प्रहराला केली. कोकणी साहित्यिक व विचारवंत दामोदर मावजो यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.ते म्हणाले की ' कोणावर गोळ्या झाडून त्यांचे विचार थांबवता येणार नाहीत'. मावजो यांना पुरेसे संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. 'मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सनातन संस्थेकडे बोट दाखवले गेले आहे. या संस्थेची चौकशी करा, आम्हाला गोव्यात अतिरेकी नकोत, ' असे रेजिनाल्ड म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मावजो यांना पुरेसे पोलीस संरक्षण दिले असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.