शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मिकींना पकडू शकत नाहीत, ही तर शरमेची बाब..!

By admin | Updated: April 22, 2015 01:46 IST

मडगाव : दहा दिवस उलटले तरी सध्या गायब असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांना पोलीस पकडू शकत नाहीत, ही शरमेची गोष्ट असून यासंबंधात

मडगाव : दहा दिवस उलटले तरी सध्या गायब असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांना पोलीस पकडू शकत नाहीत, ही शरमेची गोष्ट असून यासंबंधात काहीतरी ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी पोलिसांना फटकारले.सध्या गायब असलेले पाशेको यांच्याविरोधात अटक वॉरन्ट जारी करून ११ दिवस उलटले आहेत. पाच दिवसांनी वाढवलेली वॉरन्टची मुदत बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर न्या. कवळेकर यांनी मंगळवारी खुल्या न्यायालयात ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पाशेको हे सध्या गायब असल्यामुळे ते मुद्दामहून अटक चुकवत असल्याचा दावा करून त्यांच्यावर एफआयआर दाखल करून घ्यावा, यासाठी आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेल्या अर्जावरचा निकाल त्यांनी २७ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.दरम्यान, साहाय्यक सरकारी वकील शिल्पा नागवेकर यांनी फौजदारी आचारसंहितेच्या १९५ कलमाचा दाखला देत अशा प्रकारच्या अर्जाची दखल न्यायालयाला घेता येणे शक्य नाही, असा दावा केला. पाशेको यांच्याविरोधात रॉड्रिग्स यांनी कोलवा पोलिसांत जी अदखलपात्र तक्रार दिली आहे, त्याची दखल न्यायालयाने घेऊन एफआयआर नोंद करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा, असा रॉड्रिग्स यांचा दावा आहे.या प्रकरणी युक्तिवाद करताना अ‍ॅड. रॉड्रिग्स म्हणाले, ज्या अर्थी पाशेको हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या घरच्यांनीही केली नाही आणि विधिमंडळ सचिवालयातूनही तशी तक्रार आली नाही, त्या अर्थी पाशेको गायब नसून ते मुद्दामहून अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यासाठी त्यांना पोलिसांचा पाठिंबा मिळत आहे. पाशेको यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर शरण येण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळू शकतो. यासाठीच पोलिसांनी हा अर्ज केल्याचा दावा त्यांनी केला. यासंबंधी जो तपास चालू आहे, त्यावरही न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशीही मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे. (प्रतिनिधी)