शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांच्या भेटीनंतर पंतप्रधान दिल्लीस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 19:56 IST

ब्रिक्स परिषदेनिमित्त तीन दिवस गोव्यात घालविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी गोव्याचा निरोप घेतला

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १७  : ब्रिक्स परिषदेनिमित्त तीन दिवस गोव्यात घालविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी गोव्याचा निरोप घेतला. जाताना त्यांनी दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चाही केली आणि तुम्ही ब्रिक्सच्या तयारीबाबत चांगले काम केले, अशी पावतीही मुख्यमंत्र्यांना दिली.

14 रोजी रात्री पंतप्रधानांचे गोव्यात आगमन झाले होते. दि. 15 पासून दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये ब्रिक्स व बिमस्टॅक परिषद पार पडली. अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले. रशिया, ब्राङिाल, दक्षिण आफ्रिका आदी अकरा देशांनी परिषदेत भाग घेतला. सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून पाहुण्यांनी गोव्याचा निरोप घेण्यास आरंभ केला. पंतप्रधान मोदी हे दुपारी अडिचच्या सुमारास दिल्लीला निघाले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी विमानतळावर जाऊन त्यांना निरोप दिला. रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजनाचे आयोजन केले होते. गेले तीन दिवस गोव्यात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. विमानतळासह अभूतपूर्व हवाई व सागरी सुरक्षा होती. अतिरिक्त सुरक्षा सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आली.

चीनची गुंतवणूकदरम्यान, ब्रिक्स परिषदेला आलेली चीनसह अन्य देशांतील वरिष्ठ अधिका:यांची शिष्टमंडळे अजून गोव्यात आले. चीनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली. गोव्याच्या आयटी आणि थ्रीडी प्रिंटींग क्षेत्रत गुंतवणूक करण्यास चीन इच्छुक आहे. आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी येथे लोकमतला सांगितले.