शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले

By पंकज शेट्ये | Updated: December 3, 2023 18:23 IST

अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: माटवे - दाबोळी येथील एका विहिरीत पेट्रोलियम पदार्थमिश्रीत पाणी झाल्याचे सहा दिवसांपूर्वी उघड झाले होते. आता रविवारी (दि.३) गावातील नाल्यातील पाणीही पेट्रोलियम पदार्थमिश्रीत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्याला पेट्रोलियम पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली.

माटवे येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक जेक्सन फर्नांडिस यांच्या घराबाहेरील जुन्या विहिरीच्या पाण्याला काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थाचा वास आला. २७ नोव्हेंबर रोजी स्थानिक पंच निलम नाईक, जैवविविधता समितीचे पदाधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, मामलेदारांनी पाहणी केली होती. विहिरीत आढळलेला तो पेट्रोलियम पदार्थ कोणता हे स्पष्ट झालेले नाही. विहिरीतील पाणी एका बादलीत काढून पडताळणी केली असता त्या पाण्याला आग लागली. ते पेट्रोल अथवा डिझेल असावे अशी शक्यता आहे. त्यानंतर अग्निशामक दलाने ती विहिर सील केली आहे. या परिसरात आग लावू नये असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान झुआरी आयएव्ही प्रा. लि. व्यवस्थापनाने आतापर्यंत ३० टँकर पाणी विहिरीतून उपसले आहे. विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिसळून पाणी दूषित झाल्याप्रकरणी चिखलीच्या पंच निलम नाईक यांनी शुक्रवारी वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पेट्रोलियम पदार्थ कोठे मिसळतो आहे याचा शोध सुरू आहे. मुरगाव बंदरातून भूमिगत वाहिनीद्वारे झुआरी आयएव्ही व्यवस्थापनाकडे पेट्रोलियम पदार्थ नेले जातात. त्या वाहिनीला गळती लागली असावी असा अंदाज आहे.

रविवारी (दि. ३) सकाळी माटवे दाबोळीतील नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांचा वास यायला सुरुवात झाली. पंच निलम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून  नाल्यातील पाण्याला पेट्रोलसदृश्य पदार्थांचा वास येत असल्याचे सांगितले. रविवारपासून याची तिव्रता वाढली आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर योग्य कार्यवाही करावी. येथे आगीसारखी भयंकर घटना घडू शकते. त्यापूर्वीच सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना पावले उचलवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुरगाव बंदरातून झुआरी आयएव्ही व्यवस्थापनात जाणाऱ्या गळकी वाहिनी हटवावी.

दरम्यान, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांना संपर्क साधला असता अग्निशामक दलाचे अधिकारी, मामलेदार कार्यालयातील अधिकारी आणि झुआरी आयएव्ही व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्याचे सांगितले. लोकाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जात असल्याची माहीती त्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा