शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खलाशांबाबत याचिका 4 आठवड्यांसाठी पुढे; पुरेशा तयारीविना गोव्यात आणू नये अशी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:29 IST

पटेल याने आपल्या याचिकेत या खलाशाना गोव्यात आणण्यापूर्वी ते प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का याची तपासणी ते विमानात चढण्यापूर्वीच करावी असं म्हटलं आहे.

मडगाव: एका बाजूने समुद्रात अडकलेल्या गोव्यातील खलाशाना गोव्यात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारवर दडपण वाढत असताना राज्यात पुरेशी तयारी केल्याशिवाय या खलाशाना आणले जाऊ नये अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा पिठासमोर आली असून याच प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या याचिकेवरील सुनावणी 4 आठवाड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

मडगावच्या मुकेश छगनलाल पटेल याने ही याचिका दाखल केली होती. गोव्यात आरोग्य सुविधावीशी पुरेशी तयारी न करता या खलाशाना आणल्यास त्यापासून स्थानिकांना धोका असल्याचा दावा करून या खलाशाना परत आणण्यास निर्बंध घालावेत अशी मागणी त्याने आपल्या याचिकेत केली होती.

ही याचिका न्या. नूतन सरदेसाई  यांच्यासमोर सुनावणीस आली असता, एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी खलाशांच्या अधिकाराबद्दल मागणी करणारी अशीच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून, ती सुनावणी 4 आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हीही सुनावणी पुढे ढकळावी अशी त्यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली .

भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी केवळ खलाशीच नसून जगभरात कित्येक भारतीय अडकून पडलेले असून केंद्र सरकार या सर्व प्रश्नाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहत आहे अशावेळी या प्रश्नी घाईघाईने निर्णय घेणे योग्य नसल्याचे मतप्रदर्शन केले आहे.

पटेल याने आपल्या याचिकेत या खलाशाना गोव्यात आणण्यापूर्वी ते प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का याची तपासणी ते विमानात चढण्यापूर्वीच करावी. कुठलाही संसर्गजन्य खलाशी गोव्यात आल्यास कोरोना गोव्यात फैलावू शकतो हे ध्यानात ठेऊन पुरेशा सुविधा जोपर्यंत राज्यात तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांना गोव्यात आणू देऊ नये अशी याचिकेत मागणी केली आहे.

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय