शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जनतेच्या पैशावर डल्ला का मारता?

By admin | Updated: June 30, 2014 02:11 IST

लोकांतून विचारणा : खाण अवलंबितांची जबाबदारी खाणमालकांची

पणजी : खाण अवलंबितांना काही प्रमाणात कर्जमाफीसाठी सरकारी तिजोरीतून जनेतेचा पैसा उपलब्ध करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त होत आहे. खाणमालकांची जबाबदारी सरकार आपल्या खांद्यावर का घेत आहे, अशी विचारणा लोक करत आहेत. या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच वित्तीय संस्थांची बैठक घेतली. तीत अवलंबितांसाठी एकरकमी कर्जफेड योजना दिल्यास सरकारी तिजोरीतून मदत देण्याची तयारी दाखवली आहे. याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या संदर्भात खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले की, हा तर जनतेशी द्रोहच आहे. सरकारची तिजोरी खाणमालकांनी आधीच रिकामी केली आहे. ट्रकवाले, बार्जमालक यांना खाणमालकांनी देशोधडीला लावले आहे. या सर्वांच्या कर्जमुक्तीची जबाबदारी सरकारची नव्हे तर खाणमालकांची होती; कारण खनिज व्यवसायातून खाणमालकांनी बक्कळ पैसा कमावला आहे. त्यांनी बेकायदेशीर गोष्टी केलेल्या असतानाही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. खाणमालकांवर कारवाईही केली जात नाही किंवा त्यांच्याकडून लूट वसूलही केली जात नाही. उलट अवलंबितांसाठी सरकारी तिजोरी रिकामी करायला हे सरकार निघाले आहे. पर्रीकर हे खाणमालकांचे हस्तक बनले आहेत. अर्थतज्ज्ञ तथा समाजकार्यकर्ते राजेंद्र काकोडकर म्हणाले की, बार्जवाले किंवा ट्रकमालक यांची मालमत्ता तपासल्याशिवाय सरकारी तिजोरीतून त्यांच्या कर्जमाफीसाठी निधी देणे योग्य ठरणार नाही. एक कोटीचे कर्ज असलेल्या बार्जमालकाचे ५0 कोटींचे हॉटेल असू शकते मग अशा बार्जमालकालाही कर्जमाफी मिळणार काय. वित्त खात्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चालू आर्थिक वर्षातच १३२ कोटी, २0१५-१६ या वर्षात १६५ कोटी, २0१६-१७ या वर्षात १४८ कोटी, तर २0१७-१८ मध्ये तब्बल ४00 कोटी रुपये सरकारला देय असलेल्या रोख्यांपोटी बाहेर काढावे लागतील. खाणबंदीमुळे आधीच आर्थिक कारभार डबघाईस आलेला आहे. असे असताना देय असलेल्या रोख्यांचे पैसे बाहेर काढण्याचे हे नवे आव्हान सरकारसमोर आहे. आगामी दहा वर्षांच्या काळात रोख्यांच्या देय असलेल्या रकमेवर सुमारे ३७५६ कोटी रुपये तिजोरीतून बाहेर काढावे लागणार आहेत. सरकारने गरजेच्यावेळी रोख्यांच्या स्वरूपात खुल्या बाजारातून वेळोवेळी कर्ज उचलताना ११.५0 टक्के ते १३.0५ टक्क्यांपर्यंत व्याजाने ते घेतलेले आहे. १0 ते १५ वर्षांच्या मुदतीसाठी काढलेले अनेक रोखे आता देय ठरले आहेत. (प्रतिनिधी)