शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांचा पेडण्यात दौरा

By admin | Updated: February 12, 2017 01:29 IST

पेडणे : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पेडणेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रचारात

पेडणे : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पेडणेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रचारात मतदारसंघात कोपरा बैठक घेताना मी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी येणार, असे अभिवचन निवडणूक काळात दिले होते. ११ फेब्रुवारी रोजी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना भेटण्याचे त्यांनी मान्य केले होते. निवडणूक झाल्यावर कोणीही पुढची निवडणूक येईपर्यंत मतदारसंघात येत नाही. मात्र, मनोहर पर्रीकर यांनी दिलेला शब्द पाळला.दि. ११ रोजी सकाळी १० पासून पर्रीकर यांनी कोरगाव येथून दौऱ्याला सुरुवात केली. कोरगाव येथे कामुलकर सभागृहात मुख्य कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन तिथल्या समस्या ऐकून घेतल्या. या वेळी पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, भाजप पेडणे मंडळ प्रमुख कृष्णा गावडे, कोरगाव माजी सरपंच पंढरी आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, अमित परब, पेडणे नगराध्यक्षा स्मिता कुडतरकर, नगरसेवक दीपक मांद्रेकर, सिद्धेश पेडणेकर, राम सावळ, चंद्रकांत सावळ देसाई, नगरसेवक गजानन सावळ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावरील आढावा घेतला. आर्लेकर यांना किती मताधिक्य प्राप्त करणार याचा प्रत्येक बुथप्रमुखाने अहवाल दिला.कोरगाव येथील बैठकीत प्रामुख्याने कूळ-मुंडकार व रेतीचा विषय ऐरणीवर आला. या वेळी पर्रीकर यांनी जनहित समोर ठेवून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पेडणे येथे चंद्रकांत सावळ देसाई यांच्या निवासस्थानी आयोजिलेल्या बैठकीत पालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करून नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. आगामी सरकारही भाजपचेच असणार त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही. माझे पूर्ण लक्ष पेडणे मतदारसंघावर असून माझा पेडणे हा आवडता मतदारसंघ आहे. मी या मतदारसंघात परत परत येऊन समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करीन, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत पालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय उभारण्याविषयी मागणी झाली. तोरसे येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तोरसेचे सरपंच विलास शेट्ये, मोपा सरपंच रूपेश परब, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, कामिनी मावळणकर आदी उपस्थित होते. या ठिकाणी बेरोजगार समस्या, राष्ट्रीय महामार्गावरील बार यांवर बरीच चर्चा झाली. मोपा विमानतळ प्रकल्पावर स्थानिकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात यासाठी निर्धार करण्यात आला. उपस्थित सरपंच, पंच आदींनी ग्राम पातळीवरील समस्यांची जंत्रीच पर्रीकरांसमोर मांडली. (प्रतिनिधी)