शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्याही व्यवहारांची चौकशी व्हावी!

By admin | Updated: July 21, 2015 02:19 IST

पणजी : लुईस बर्जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे.

पणजी : लुईस बर्जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. मात्र, या प्रकरणाबरोबरच मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना या कंपनीला मोपा विमानतळाचा टेक्निकल फिजिबिलीटी अहवाल तयार करण्यासाठी देण्यात आलेल्या १४ कोटींच्या कन्सल्टन्सी शुल्काच्या बाबतीतही चौकशी व्हावी, अशी मागणी पक्षाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे. आमदार रेजिनाल्ड यांनी पणजी येथील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करताना, चौकशीच्या धमक्या या पर्रीकरांच्या पोकळ डरकाळ्या असल्याचे सांगितले. काँग्रेसने अनेक घोटाळे केल्याचे आरोप करणारे पर्रीकर एकाही घोटाळा प्रकरणाची तड लावू शकले नाहीत. कोणत्याही घोटाळ्यात आतापर्यंत एखाद्याला दोषी ठरविणे दूरच; परंतु अरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनीही काहीच केले नाही आणि आताचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही काहीच केले नाही, असे रेजिनाल्ड म्हणाले. पर्रीकर यांच्या काळात मोपा विमानतळाविषयी शक्याशक्यता पडताळणीसाठी याच कंपनीला कंत्राट का देण्यात आले? या कंपनीला १४ कोटी रुपये का देण्यात आले, याची उत्तरे त्यांनी द्यावीत. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे दिले जात असेल, तर या व्यवहाराविषयीही तपास व्हावा. या प्रकरणात पर्रीकर किंवा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुन्हा ‘यू टर्न’ घेतले, तर राज्यात काँग्रेसच्या काळात एकही घोटाळा झाला नव्हता, असाच त्याचा अर्थ होईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत उपस्थित होते. त्यांनीही या दोन्ही प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)