शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

कुंकळ्येकरांसाठी पर्रीकरांची बॅटिंग

By admin | Updated: February 6, 2015 01:43 IST

पणजी : वेळ गुरुवारी सायंकाळी सहाची. स्थळ मळा-पणजी. एक खासगी कार हेडगेवार हायस्कूलसमोरील जागेत येते.

पणजी : वेळ गुरुवारी सायंकाळी सहाची. स्थळ मळा-पणजी. एक खासगी कार हेडगेवार हायस्कूलसमोरील जागेत येते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्या गाडीतून खाली उतरतात. भाजपचे विविध वयोगटांतील कार्यकर्ते हायस्कूल परिसरात अगोदरच अर्धा तास थांबलेले असतात. मात्र, या कारमधून देशाचे संरक्षणमंत्री पर्रीकर येतील, याची कुणालाच कल्पना नसते. पर्रीकरांसोबत भाजपचे पणजीतील उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे गाडीतून खाली उतरतात आणि भाजपचे कार्यकर्ते व मळा भागातील नागरिक त्यांच्याभोवती गर्दी करतात. संरक्षणमंत्री आता प्रत्येकाच्या घरी भेट देणार आहेत, या भावनेनेच मळावासीय व पणजीवासियांचे चेहरे खुलतात... पुरुष व महिला कार्यकर्त्यांनीही पर्रीकर यांना गराडा घातला. पर्रीकरांसोबत सगळेजण फोटो काढून घेऊ लागले. ‘सेल्फी’चा अनुभव पर्रीकर घेऊ लागले. ‘सेल्फी घेता की काय,’ पर्रीकरांनी हसत हसत विचारले. मळ्यातील अनेक हिंदू व ख्रिस्ती नागरिक पुढे येऊन पर्रीकर यांच्याशी हस्तांदोलन करू लागले. संरक्षणमंत्री बनल्यानंतर पर्रीकर प्रथमच ‘होमग्राउंड’वर येत असल्याचे पाहून पणजीवासियांचे चेहरे फुलले असल्याचे पाहायला मिळाले. हायस्कूलसमोरच पर्रीकर यांनी प्रथम बैठक घेतली. आपण पणजीवासियांशी संबंध व संपर्क कायम ठेवीन. पणजीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देईन, अशी ग्वाही पर्रीकर यांनी दिली. २0 वर्षांपूर्वी पणजीत प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा ४ हजार ६०० मते मिळवली होती. २०१२ साली निवडणूक लढविली, तेव्हा ११ हजार मते मिळविली. आता भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर हे रिंगणात असून मतांचे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. त्यानंतर, ‘भाजपचा विजय असो, सिद्धार्थ तुम आगे बढो, भार्इंचा विजय असो,’ अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी वातावरणात जोष भरला. (खास प्रतिनिधी)