शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांनी गोव्यात परतावे - तेंडुलकर

By admin | Updated: January 25, 2017 03:38 IST

राज्यात पुढील सरकार मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करील, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर

पणजी : राज्यात पुढील सरकार मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करील, असे संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर काही तासांतच प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही पर्रीकर यांना गोव्यात परत आणले जावे, अशी लोकांची इच्छा असल्याचे म्हटले आहे.तेंडुलकर म्हणाले की, पर्रीकरांचा लोकसंपर्क दांडगा आहे, त्यामुळेच त्यांना परत गोव्यात आणावे अशी मागणी आहे. परंतु त्याबाबतचा निर्णय निवडून येणारे भाजपाचे आमदारच एकत्रितपणे घेणार आहेत. पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी नसले तरी गोव्याचा कारभार तेच हाताळतील, असे प्रतिपादन शहा यांनी सोमवारी गोवा भेटीवर असताना केले होते. गोव्यातील लोकांची मागणी व अपेक्षा यावरून शहा यांनी वरील विधान केले असावे, असे तेंडुलकर म्हणाले. सध्या पर्रीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे पक्षाच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आमदारच नेता ठरवतील आणि हा निर्णय निवडणुकीनंतरच होणार आहे.संघाबद्दल विचारले असता तेंडुलकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक कधीच राजकारणात हस्तक्षेप करीत नाहीत, त्यांचा भाजपाला आशीर्वाद आहे आणि या निवडणुकीतही ते आमच्याबरोबरच आहेत. गोवा सुरक्षा मंच पक्ष स्थापन झाला तेव्हा पुढील सरकार आमचेच असेल, असा दावा ते करीत होते. आता केवळ चार जागा हा पक्ष लढवित आहे. तथापि एकही जागा हा पक्ष जिंकू शकणार नाही. त्यांच्यामुळे भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही. केडरचे लोक आमच्याबरोबर आहेत, असा दावा तेंडुलकर यांनी केला. शुक्रवारी २७ जानेवारीला भाजपाचा जाहीरनामा घोषित होणार आहे. गेल्या पाच वर्षांचा अनुभव जाहीरनामा तयार करण्यासाठी कामी आला. काही अपूर्ण गोष्टी आहेत त्यांचा अंतर्भाव पुन: केला जाणार असून ते प्रश्न मार्गी लावू. २0१२ च्या जाहीरनाम्यातील ९0 टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा तेंडुलकर यांनी केला. (प्रतिनिधी)