शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर-पार्सेकर ‘फोर्स’च्या बाजून

By admin | Updated: January 5, 2016 02:05 IST

पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन तीव्र होत असले, तरी डायोसेझन शिक्षण संस्थेच्या इंग्रजी शाळांचे अनुदान

पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन तीव्र होत असले, तरी डायोसेझन शिक्षण संस्थेच्या इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करायचे नाही, असे शासकीय स्तरावर तत्त्वत: ठरले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा कल पूर्णपणे इंग्रजीसाठी आंदोलन करणाऱ्या ‘फोर्स’ संघटनेच्या बाजूने आहे. भाजपचे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर हे ‘फोर्स’ संघटनेच्या मागणीविरुद्ध जाण्याच्या मन:स्थितीत नाहीत. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याचा विषय हा सावईकर यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सोयीचा नाही, याची कल्पना भाजपला काहीजणांनी दिली आहे. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद केले, तर चर्च संस्था दुखावेल व ‘फोर्स’ संघटना पुन्हा आंदोलन तीव्र करील, असे भाजपला वाटते. पर्रीकर व पार्सेकर यांनी खासगीत भाजपच्या मंत्री, आमदारांना सरकारच्या धोरणाची कल्पना दिली आहे. मराठी व कोकणीत प्राथमिक शिक्षण घेण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन द्यावे; पण डायोसेझनच्या शाळांचे अनुदान बंद करायचे नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. पर्रीकर व पार्सेकर यांच्यात याविषयी चर्चाही झाली आहे. पंजाबमध्ये शनिवारी अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यामुळे पर्रीकर यांना तातडीने दिल्लीस जावे लागले. अन्यथा ते शनिवारी पणजीत भाजपच्या मंत्री व आमदारांना मार्गदर्शन करणार होते व त्या वेळीच इंग्रजी शाळांचे अनुदान कायम ठेवावे व विधेयकही आणावे, यावर शिक्कामोर्तब झाले असते. मुख्यमंत्री पार्सेकर सभागृहाच्या चिकित्सा समितीचा अहवाल येत्या अधिवेशनात ठेवतील व अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मार्चमध्ये प्रत्यक्ष विधेयक मांडतील, अशी चर्चा सरकारमध्ये सुरू आहे. भाजपचे काही मंत्री इंग्रजी शाळांचे अनुदान सुरूच ठेवावे, या मताचे आहेत. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी तर जाहीरपणे तसे मत मांडले आहे. (खास प्रतिनिधी)े