शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्रिकर म्हणजे गोमंतकीयांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिलेले रत्नच- मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 19:16 IST

मनोहर पर्रीकर यांच्या रुपाने गोमंतकीयांनी आपल्या मंत्रिमंडळाला एक रत्नच दिले आहे

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 -  मनोहर पर्रीकर यांच्या रुपाने गोमंतकीयांनी आपल्या मंत्रिमंडळाला एक रत्नच दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांची तोंडभर स्तुती केली. संरक्षणमंत्रिपदाची पर्रिकरांची कारकीर्द स्वच्छ असल्याचा निर्वाळा देताना कोणीही त्यांच्याकडे बोट दाखवू शकलेले नसल्याचे मोदी म्हणाले. या स्तुतिसुमनांवरून पर्रीकर दिल्लीतच राहतील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आपल्या भाषणातील सुमारे सात मिनिटे त्यांनी पर्रीकरांच्या स्तुतिवरच घालवली. सैन्य दलाचा वन रँक वन पेन्शनचा (ओआरओपी) प्रश्न गेली ३0 वर्षे रखडला होता. पर्रीकर यांनी तो सोडवला. गोमंतकीयांनी आपल्याला उत्तम साथिदार दिला त्याबद्दल गोव्यातील जनता अभिनंदनास पात्र आहे. गोव्याला राजकीय अस्थैर्याच्या आजाराने बरबाद केले होते. पर्रीकर यांनी गोव्यात राजकीय स्थैर्य आणले. विकास, लोक कल्याणकारी योजना दिल्या. नीतीच्या आधारावर राज्य केले. ते गोव्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपण गुजरातचा मुख्यमंत्री होतो. पर्रीकर यांनी त्यावेळी गोव्यात ज्या योजना राबवल्या त्या योजनांचा मीही बारकाईने अभ्यास करीत होतो. गृहिणींना दरमहा दीड हजार रुपये मानधन देणारी ह्यगृहआधारह्ण, मुलींना विवाहासाठी १ लाख रुपये देणारी लाडली लक्ष्मी योजना किंवा ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मानधन देणारी योजना व आता जनतेच्या आरोग्याचा विमा उतविणारी दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना अशा योजना देशातील अन्य राज्यांमध्ये कुठेही नाहीत. गोव्याची प्रगती नतमस्तक होण्यासारखीच आहे. आयआयटीवाले पर्रीकर दहा वाक्यात सांगायची गोष्ट एकाच वाक्यात सांगतात कधी कधी आपल्यालाही समजून घेताना अडचण येते, असेही मोदी पर्रीकरांच्या हुशारीबद्दल बोलताना म्हणाले. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पर्रीकर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुन: गोव्यात येतील, अशी अटकळ गेले काही महिने बांधली जात होती. अर्थात पर्रीकर यांनी आपण केंद्रातच राहीन, असे आधीही स्पष्ट केलेले आहे. मोदी यांनी त्यांच्या कामावर अत्यंत समाधान दाखवून उलट स्तुतीच केल्याने पर्रीकर कें द्रातच राहतील हे आता अधोरेखित झाले आहे.