शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत वाहतूक कोंडी

By admin | Updated: May 27, 2016 02:53 IST

पणजी : अग्निशामक दलाने राजधानी शहरात गुरुवारी अचानक झाडांच्या फांद्या कापण्याचे काम हाती घेतल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

पणजी : अग्निशामक दलाने राजधानी शहरात गुरुवारी अचानक झाडांच्या फांद्या कापण्याचे काम हाती घेतल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रखरखत्या उन्हात दुचाकीस्वारांचे हाल झाले. आंबेडकर उद्यानाजवळ सकाळी ११.३0 च्या सुमारास झाडे कापण्याचे काम सुरू होते त्यामुळे शहरातून बाहेर पडणारी वाहतूक तुंबली आणि मोठी कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना नाकीनऊ आले. आधीच कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना या वाहतूक कोंडीत सापडलेल्या दुचाकीस्वारांना घामाच्या धारा लागल्या. रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे काम अग्निशामक दलाने कोणतीही पूर्वसूचना न देता हाती घेतले त्यामुळे वाहनधारकांनी या दलाच्या नावाने बोटे मोडली. दुपारी उशिरापर्यंत शहरात सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आंबेडकर उद्यानाजवळ मोठ्या फांद्या कापल्याने वाहतूक बराच वेळ तुंबली. जुन्या पाटो पुलावरून पुढे येऊन शहराबाहेर पडू पाहणाऱ्या वाहनधारकांना रुची हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागले. स्थिती वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेली. (प्रतिनिधी)